वाचनाच्या आवडीने अक्षरश: झपाटलेल्या पुस्तकप्रेमींनी एव्हाना हे फोटो सोशल मीडियावर पाहिले असतलीच. ‘पुस्तकप्रेमींची नवी पंढरी’, ‘आवर्जून पाहण्यासारखं ग्रंथालय’ असा कौतुकाचा वर्षाव ग्रंथालयावर होत आहे. मात्र, चीनमधील तरूण या ग्रंथालयामुळे फारसे प्रभावित झालेले नाहीत. कारण सहा मजल्याच्या या ग्रंथालयामध्ये प्रत्यक्ष पुस्तकांपेक्षा त्यांच्या आभासी प्रतिमाच जास्त आहेत असं इथल्या वाचकांचं म्हणणं आहे.

त्याच्या प्रयत्नाला सलाम! चिमुकलीला वाचवण्यासाठी १४ तासांचं अंतर ७ तासांत कापलं

Video : पोटात गोळी लागूनही सुरक्षारक्षकाने दिली चोरांशी झुंज

चीनमध्ये सुरू झालेली ‘द स्लिक ताईंजिन बिनहाई’ ग्रंथालयाची त्याच्या भव्यतेमुळे सोशल मीडिया साईट ‘व्हिबो’वर चर्चा सुरू झाली. प्रत्येक मजल्यावर पुस्तकांसाठी खण करण्यात आले होते, या खणांपर्यंत पोहोचण्यासाठी काचेचे जिने देखील होती. या भव्यतेमुळे पुस्तकवेडे अनेक लोक या ग्रंथालयात पोहोचले. मात्र, प्रत्येक मजल्यावर पुस्तकं नसून पुस्तकांचा आभास निर्माण केल्यानं वाचक मात्र नाराज झाले. मजल्यावर खण तयार करून त्यावर पुस्तकांचा आभास निर्माण करणाऱ्या प्रिंट लावल्या होत्या. ग्रंथालयात येणाऱ्या अनेकांच्या मनात यामुळे गोंधळ निर्माण झाला. अनेकांनी यावर नाराजीही व्यक्त केल्याचे ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. या ग्रंथालयात सध्या २० हजार पुस्तकं आहे. पुस्तकांची संख्या १० लाखांपर्यंत नेण्याचा ग्रंथालयाचा मानस आहे.