अमेरिका आणि मेक्सिको या दोन देशांमधील सीमा स्थलांतरीतांच्या समस्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. परंतु यावेळी ही सीमा एका आगळ्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. अमेरिका आणि मेक्सिको या दोन देशांच्या सीमेवर लहान मुलांना खेळण्यासाठी ‘सी-सॉ’ लावण्यात आले आहेत. या सीसॉवर खेळणाऱ्या मुलांचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

या ‘सी-सॉ’च्या एका बाजूला अमेरिकन नागरिक तर दुसऱ्या बाजूला मॅक्सिकन नागरिक खेळताना दिसत आहेत. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे शिक्षक रोनाल्ड रेल आणि सॅन जोस युनिव्हर्सिटीचे शिक्षक सॅन फ्रँटेलो या दोघांनी मिळून ही कल्पक संकल्पना अस्तित्वात आणली आहे.

 

View this post on Instagram

 

One of the most incredible experiences of my and @vasfsf’s career bringing to life the conceptual drawings of the Teetertotter Wall from 2009 in an event filled with joy, excitement, and togetherness at the borderwall. The wall became a literal fulcrum for U.S. – Mexico relations and children and adults were connected in meaningful ways on both sides with the recognition that the actions that take place on one side have a direct consequence on the other side. Amazing thanks to everyone who made this event possible like Omar Rios @colectivo.chopeke for collaborating with us, the guys at Taller Herrería in #CiudadJuarez for their fine craftsmanship, @anateresafernandez for encouragement and support, and everyone who showed up on both sides including the beautiful families from Colonia Anapra, and @kerrydoyle2010, @kateggreen , @ersela_kripa , @stphn_mllr , @wakawaffles, @chris_inabox and many others (you know who you are). #raelsanfratello #borderwallasarchitecture

A post shared by Ronald Rael (@rrael) on

मॅक्सिकन नागरीक अमेरिकेत स्थलांतरीत होत असल्यामुळे अमेरिका आणि मेक्सिको या दोन देशांमधील सीमावाद गेल्या काही काळात प्रखर झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर या वादात आणखीनच भर पडली. वर्षानुवर्षे दोन्ही देशांमध्ये सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी या ‘सी-सॉ’ची निर्मिती करण्यात आल्याचे मत रोनाल्ड रेल आणि सॅन फ्रँटेलो या दोघांनी व्यक्त केले आहे.