यंदाच्या वर्षी आपण भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिन करण्यास सज्ज झालो आहोत. त्याच पार्श्वभूमीवर अभिनेते आणि कवी पियूष मिश्रा यांच्या आवाज असलेला एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. स्वांतत्र्य म्हणजे काय? या शिर्षकाखाली हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत आपल्याला देण्यात आलेल्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विविध उदाहरणे देत व्हिडीओत स्वातंत्र्याचा अर्थ काय हे विचारण्यात आले आहे.

‘आझादी है क्या?’ हिंदी मधल्या ह्या कवितेत लोकांच्या दैनंदिन जीवनातील परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. आपण बऱ्याचदा आपल्याकडून मिळालेल्या स्वातंत्र्याचा चुकीचा उपयोग होतो, याची उदाहरणे दिली आहेत. रस्त्यावर राष्ट्रध्वज विकणाऱ्या मुलीकडून एक मुलगा राष्ट्रध्वज न विकत घेता फक्त फोटोसाठी जवळ बोलावतो.

तसेच अन्य एका ईशान्येकडील राज्यातील एका व्यक्तीला नॉर्थ-ईस्टर्न म्हणून हाक मारताना दाखवले आहे.