X

विमानातून प़डला माशांचा पाऊस, पाहा व्हिडिओ

यापूर्वी अशाप्रकारचं तंत्र वापरून तळ्यात मासे सोडलेलं कोणीही पाहिलं नव्हतं त्यामुळे हा व्हिडिओ अधिकच व्हायरल होत आहे.

काही महिन्यांपूर्वी रशियाच्या एका गावात सोन्याचा पाऊस पडला होता ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाली होती. आता युटामध्ये चक्क विमानातून माशांचा पाऊस पडला आहे. त्याच झालं असं येथील एका तलावात मासे सोडायचे होते, मात्र हे पारंपारिक पद्धतीनं न सोडता ते आकाशातून तळ्यात सोडण्यात आले.

एक लहानसं विमानं छोट्या माशांना घेऊन तळ्यावर घिरट्या घालत होतं. तळ्याच्या मध्यभागावर आल्यानंतर या विमानातून मासे तळ्यात सोडण्यात येत होते. हे दृश्य विमानातून चक्क माशांचा पाऊस पडतोय असंच वाटत होतं. यापूर्वी अशाप्रकारचं तंत्र वापरून तळ्यात मासे सोडलेलं कोणीही पाहिलं नव्हतं त्यामुळे हा व्हिडिओ अधिकच व्हायरल होत आहे.आकाशातून मासे तळ्यात सोडणं हे सर्वात सोपं काम आहे. तसेच या प्रक्रियेमुळे मासे दगावण्याची किंवा जखमी होण्याची शक्यता कमी असते म्हणूच कैक फुटांवरून मासे सोडण्यात आले असं संबधित वनविभागाचं म्हणणं आहे. मात्र अनेकांना ही पद्धत मुर्खपणाची वाटली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर यावरून अनेकांनी टीका केलीय तर दुसरीकडे अशा प्रकारे तळ्यात मासे सोडण्याच्या पद्धतीमुळे अनेकांना या तंत्राविषयी कुतूहल निर्माण झालं आहे.