News Flash

कौतुक मोदींनी स्वत:ची छत्री स्वत: पकडल्याचं… मनमोहन सिंग, राहुल गांधींचे जुने फोटोही झाले व्हायरल

अनेकांनी पंतप्रधान मोदींचा हा फोटो शेअर करत यापूर्वीच्या पंतप्रधानांचे तसेच राहुल गांधींचेही काही जुने फोटो शेअर केल्याच्य ट्विटरवर दिसून येत आहे

अनेक जुने फोटोही व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य, ट्विटरवरुन साभार)

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. १९ दिवस चालणाऱ्या या आधिवेशनामध्ये करोना व्यवस्थापन, इंधन दरवाढ आदी मुद्दय़ांवरून सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न असून, अनेक विधेयके मंजूर करून घेण्यावर सरकारचा भर असेल. मात्र आज अधिवेश सुरु होण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. विशेष म्हणजे दिल्लीमध्ये आज पाऊस असतानाही पंतप्रधानांनी संसद भवनाच्याबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मोदींबरोबर मोजके नेते उपस्थित होते. करोनाविरोधातील लढाईत आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदींनी पावसात स्वत: छत्री धरुन संवाद साधल्यामुळे आता मोदींनी स्वत: स्वत:ची छत्री धरल्याबद्दल कौतुक होतानाचं चित्र सोशल नेटवर्किंगवर दिसत आहे.

ट्विटरवरील सोशल इन्फ्यूएन्सर असणाऱ्या पायल मेहता यांनी मोदींचा हा संसद भवनाबाहेरचा फोटो ट्विट करुन त्यावर प्रतिक्रिया दिलीय. “सकाळपासून पाऊस असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेमध्ये आहे. त्यांनी स्वत:ची छत्री स्वत: पकडली होती हे विशेष, (आता ट्रोलर्स त्यांच्यावर तुटून पडतील),” असं पायल यांनी म्हटलं आहे.

केवळ पायलच नाही इतर अनेकांनाही मोदींच्या या कृतीचं कौतुक केलं आहे. पाहुयात काही ट्विट्स…

१) नव्या पद्धतीच्या राजकारणाचे संकेत

२) छान कृती

३) साधी कृती उच्च विचार

४) नवा भारत

५) करोना नियमांमुळे असणार

६) मोदींचा साधेपणा पाहा…

७) अशीही तुलना काहींनी केलीय

८) रोजगार देता आला असता…

९) आदर्श ठेवण्यासारखं…

१०) मोठा नेता

११) चार नेते चार पद्धती…

१२) एक ही दिल है कितनी बार जितोगे…

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी जास्तीत जास्त प्रश्न विचारावेत असं आवाहन केलं आहे. “मी सर्व पक्षांना आणि खासदारांना हे आवाहन करू इच्छितो की, जास्तीत जास्त अवघड प्रश्न विचारा, धारदार, बोचरे प्रश्न विचारा मात्र सरकारला शांततेत, शिस्तबद्ध रितीने त्या प्रश्नांची उत्तरं देण्याची संधीही द्या. यामुळे लोकशाही आणि लोकांचा विश्वास अधिक बळकट होण्यास मदत होईल. तसंच विकासाची गतीही वाढेल,” असं मोदी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 12:19 pm

Web Title: pm modi himself holding his own umbrella photo goes viral scsg 91
Next Stories
1 टोकियो ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलीट्साठी ‘anti-sex’ बेड्स; नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया!
2 घरात घुसलेल्या कोब्राकडून कुटुंबाचा पाठलाग; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद
3 Video : मुंबईत पावसाच्या पाण्यात आलं हरीण; पुढे काय झालं बघा…
Just Now!
X