आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७० वा वाढदिवस आहे. या वर्षी मोदींचा वाढदिवस हा ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र आज मोदींच्या वाढदिवसानिमित्त विरोधकांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर टीका करण्यास सुरुवात केल्याचे सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजपाला विरोध करणाऱ्या पक्षांनी वेगवेगळे हॅशटॅग ट्रेण्ड केले आहेत. #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस तसेच #NationalUnemploymentDay या बेरोजगारीशी सबंधित हॅशटॅगबरोबरच #जुमला_दिवस हा हॅशटॅगही चांगलाच चर्चेत आहे. या हॅशटॅगवर काही तासांमध्ये २४ हजारांहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. या हॅशटॅगच्या माध्यमातून मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त विरोधकांनी त्यांनीच दिलेली आश्वासनांची आठवण करुन दिलीय.

नक्की वाचा >> मोदींच्या वाढदिवशीच ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ ट्रेण्डमध्ये; दाढीऐवजी रोजगार वाढवण्याचा तरुणांचा खोचक सल्ला

प्रामुख्याने काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या समर्थकांनी हा हॅशटॅग ट्रेण्ड केला आहे. यामध्ये अगदी स्वच्छ भारत मोहिमेपासून ते विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या बिहारमधील हरित बिहार घोषणेपर्यंत अनेक गोष्टींची आठवण विरोधकांनी पंतप्रधानांना आणि पर्यायाने भाजपाला करुन दिली आहे.

नक्की पाहा >> Birthday Special : एक लाखांचा पेन, सव्वा लाखांचे घड्याळ अन् गॉलची किंमत…; पाहा मोदींकडील वस्तूंच्या किंमती

पाहुयात काही व्हायरल झालेली ट्विट…

१) हरित बिहार म्हणाला होता

२) अर्थव्यवस्थाही देवावर सोडली

३) मुख्य मुद्यांबद्दल कधी बोलणार?

४) स्वच्छ भारत मोहिमेचे काय?

५) आम्ही साजरा करतोय बेरोजगारी दिवस

६) काहींनी लोगो पण तयार केला

७) त्या नोकऱ्या कुठं आहेत?

८) त्यांची कर्ज माफ

९) जुमला नंतर आधी नोकऱ्या द्या

१०) ये देश नही बिकने दूंगा असं म्हणाला होता ना?

११) नेते आणि आम्ही

१२) फरक

सोशल नेटवर्किंगवर आज भाजपा समर्थक आणि भाजपा विरोधकांमध्ये हॅशटॅग वॉर सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे #जुमला_दिवस, #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस असे हॅशटॅग ट्रेण्ड होत असतानाच दुसरीकडे #HappyBirthdayPMModi हा हॅशटॅगही ट्रेण्ड होताना दिसत आहे. त्याचबरोबरच Modi ji, #NarendraModiBirthday या हॅशटॅगचीही चर्चा आहे.