पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवासानंतर त्यांच्या आई हिराबेन मोदी पुन्हा एकदा सोशल मीडियामध्ये ट्रेंडिगमध्ये आल्या आहेत. हिराबेन यांनी मंगळवारी सकाळी गांधीनगरमधील बँकेत रांगेत उभे राहुन पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा बदलून घेतल्या. त्यानंतर सकाळपासून नेटिझन्समध्ये मोदींच्या आईविषयी चर्चा रंगली आहे. ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून हद्दपार झाल्यानंतर सध्या देशात नोटांविषयीची चर्चा कमी होताना दिसत नाही. सकाळपासून रांगेत उभे राहुन जनता त्रस्त झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत असताना मोदींच्या वयोवृद्ध आईचे काही नेटीझन्स कौतुक करताना दिसतात. जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी रागेंमध्ये उभा रहावे लागत असल्यामुळे सरकारच्या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्यांसाठी सोशल मीडियावरुन मोदींच्या आईचा दाखला दिला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई वयाच्या ९४ वर्षी रांगेत उभे राहुन जुन्या नोटा बदलून घेत असतील तर आपण का नाही? असा सवाल मोदींच्या समर्थकाकडून करण्यात येत आहे. हिराबेन यांनी जुन्या नोटा बदलुन घेताना विशेषसेवा घेतली नसल्याचे सांगत काही जण त्यांचे कौतुक करत आहेत. एका नेटीझन्सने हिराबेन यांना २१ व्या शतकातील जीजामाता असे संबोधले आहे. तर एका नेटीझन्सने हिराबेन मोदी यांच्या कृतीवर उमटणाऱ्या प्रतिक्रियांना प्रत्युत्तर देताना मोदी भक्तांसाठी हिराबेन मदर इंडिया वाटू लागल्याचे म्हटले आहे.

रमन नावाच्या एका नेटीझन्सने वयाच्या ९४ वर्षी रांगेत उभे राहण्याची हिराबेन यांची कृती प्रेरणादायी असल्याचे सांगत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मोदींच्या आईंकडून प्रेरणा घेऊन राहुल गांधी यांनी सोनिया गांधींना स्विस बँकेत जाण्याची विनंती करावी, असे विनोदी ट्विट केले आहे. या ट्विटचा कौल जाणून घेण्यासाठी रमन याने सोनिया गांधीचे स्विस बँकेत खाते आहे किंवा नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावर आतापर्यंत ७० टक्के नेटीझन्सनी सोनियांचे स्विस बँकेत खाते आहे असे मत नोंदविले. तर ३० टक्के लोक सोनियांचे स्विस बँकेत खाते नाही