05 July 2020

News Flash

मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा होणार लिलाव, तुम्हीही करु शकता खरेदी

यापूर्वी नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या १८०० भेटवस्तूंचा लिलाव करण्यात आला होता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या २७०० भेटवस्तूंचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे. १४ सप्टेंबर रोजी या भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या भेटवस्तूंची किंमत २०० रुपयांपासून सुरु होत आहे, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा www.pmmementos.gov.in या संकेतस्थळावर लिलाव करण्यात येणार आहे. या वस्तूंची किंमत २०० रुपयांपासून ते २.५ लाख रुपयांपर्यंत आहे. या लिलावातून मिळणारी रक्कम केंद्र सरकारतर्फे गंगेच्या स्वच्छतेसाठी असलेल्या ‘नमामी गंगे’ या मोहिमेच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे.

दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या जवळपास १८०० भेटवस्तूंचा काही दिवसांपूर्वीच लिलाव करण्यात आला होता. आता पुन्हा भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2019 5:16 pm

Web Title: pm narendra modi to auction gifts to donate proceeds to namami gange ssj 93
Next Stories
1 उद्धव ठाकरे, फडणवीस राष्ट्रवादीत; आव्हाडांकडून मिश्किल विनोद
2 नागिन डान्स करताना तरूणाचा कार्डिअॅक अरेस्टने मृत्यू
3 सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या मांजरीचा मृत्यू; तब्बल ७०० कोटींची होती मालकीण
Just Now!
X