18 January 2019

News Flash

फेकन्युज : डोक्याची ‘बॅटरी’ चालवा!

साताऱ्यातील ‘पोदार इंटरनॅशनल स्कूल’चा विद्यार्थी अथर्व कदम याने एक संदेश तयार केला आहे.

‘हा संदेश किमान तीन जणांना पाठवा, तुमचे भले होईल’ अशा प्रकारचा संदेश ‘व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठा’तून नेहमीच प्रसारित होतो. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे हे संदेश डोक्याचा अजिबात वापर न करता तयार केलेले असतात. मात्र हे संदेश खरेखुरे आहेत, असे समजून त्याची अंमलबजावणी करणारे महाभाग काही कमी नाहीत. आता हाच संदेश पाहा ना..

साताऱ्यातील ‘पोदार इंटरनॅशनल स्कूल’चा विद्यार्थी अथर्व कदम याने एक संदेश तयार केला आहे. त्यात पन्नासेक सेल बॅटरी आणि माऊसचे इमोजी आहेत. हा संदेश जर तुम्ही तीन व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपला पाठवला तर तुमची बॅटरी १०० टक्के चार्ज होणार आहे. सोबत त्या ‘महान संशोधका’चा म्हणजे अथर्व कदमचा मोबाइल क्रमांकही आहे. या क्रमांकावर दूरध्वनी केला तर तो कधीच लागत नाही. अनेक जण अशा प्रकारच्या  संदेशांच्या सत्याची पडताळणी करत नाहीत. आता संदेशानुसार जर मोबाइल चार्ज होत असेल, तर मोबाइल कंपन्यांनी चार्जरची निर्मितीच थांबवली असती. या प्रकारच्या संदेशांमध्ये कोणत्याच प्रकारचा तर्क नाही. त्यामुळे जरा डोक्याची बॅटरी चालवा!

First Published on May 17, 2018 12:21 am

Web Title: poddar international school fake news