27 October 2020

News Flash

दुर्मिळ! 40 वर्षांनी ध्रुवीय अस्वलाचं ‘दर्शन’, उपासमारीमुळे घरापासून शेकडो मैलांवर

स्थानिक रहिवाशांना तेथील टुण्ड्रा प्रदेशात फिरताना सावधगिरी बाळगण्याचे आदेश तेथील प्रशासनाने दिले आहेत.

उपासमारीमुळे थकलेले ध्रुवीय अस्वल काही दिवसांपूर्वी सायबेरियच्या औद्योगिक वसाहतीत भटकताना पाहायला मिळाले, जे त्याच्या नेहमीच्या निवासस्थानापासून शेकडो मैलांवर आहे.

याआधी ४० वर्षांपूर्वी नॉर्सिक येथे हे ध्रुवीय अस्वल पाहण्यात आले होते. त्यानंतर आता हे अस्वल आपले मूळ ठिकाण सोडून खाण्याच्या शोधात सायबेरिया येथील शहरी भागात फिरताना आढळले आहे.

अस्वलाला पहिल्यांदा तेथील मुलांच्या गटाने पाहिले होते, त्यांनी व्हिडिओ शूट करून इन्स्टाग्राम वर पोस्ट केला होता. हवामान बदलामुळे आर्कटिक समुद्रातील बर्फ वेगाने वितळत आहे. त्यामुळे अन्नाच्या शोधात तेथील प्राणी आपली मूळ जागा सोडत आहेत.

स्थानिक रहिवाशांना तेथील टुण्ड्रा प्रदेशात फिरताना सावधगिरी बाळगण्याचे आदेश तेथील प्रशासनाने दिले आहेत.

ध्रुवीय अस्वलाची घातक प्राण्यांमध्ये व रशियामधील नामशेष होणाऱ्या प्राण्यांमध्ये गणना केली जाते. जगभरात २२,००० ते ३१,००० ध्रुवीय अस्वल असल्याचे तेथील स्थानिक संस्थांकडून सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2019 3:50 pm

Web Title: polar bear wandering in russian city
Next Stories
1 Fact Check : ‘काश्मीर नको विराट कोहली द्या’, जाणून घ्या ‘या’ फोटोमागील सत्य
2 क्रिकेट खेळा आणि 2000 रुपये जिंका, Google Pay ची भन्नाट ऑफर
3 VIDEO: भारतातील शेतकऱ्याने उभारला ट्रम्प यांचा ६ फुटांचा पुतळा
Just Now!
X