एखादी बेवारसी वस्तू सार्वजनिक ठिकाणी आढळली तर तिची माहिती तातडीनं पोलिसांना किंवा तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना द्यावी, प्रत्येक जागरुक नागरिकाचं हे कर्तव्यच आहे. पण, रोम विमानतळावर संशयित बॅग आढळल्यानंतर इटालियन पोलिसांनी हे प्रकरण ज्या पद्धतीनं हाताळलं त्यामुळे सोशल मीडियावर विनोदाचा अक्षरश: पाऊस पडला आहे.

विमानतळावर संशयीत बॅग आढळल्यानंतर इटालियन पोलिसांनी विमानतळावरचा काही परिसर रिकामी केला आणि स्फोटकांच्या साह्यानं ही बॅग उडवून दिली. यात कदाचित घातपात घडवण्यासाठी शस्त्र असतील असं वाटल्यानं पोलिसांनी ही बॅग उडवून दिली. मात्र यात स्फोटकं नसून काही कपडे आणि फक्त नारळ होते.

जेव्हा पोलीस बॅगेची विल्हेवाट लावत होते तेव्हा प्रवासी पोलीसांपासून चक्क काही मीटर अंतरावरच उभे होते. सुदैवानं या बेवारशी बॅगेत कोणतीही स्फोटकं नव्हती नाहीतरी खूप मोठी दुर्घटना येथे घडली असती. मात्र बॅग स्फोटकांनी उडवून दिल्यानंतर त्यात फक्त नारळ होते हे कळल्यावर प्रवशांमध्ये एकच हाशा पिकला.