देशांतील नागरिकांच्या संरक्षणासाठी नेहमीच धडपडत असलेल्या फिलिपिन्समधल्या महिला पोलीस अधिकाऱ्यानं सौंदर्यस्पर्धेत बाजी मारली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘मिस फिलिपाइन नॅशनल पोलीस सौंदर्य स्पर्धे’त सहभागी झालेल्या रोसीलीनं ‘मिस फिलिपाइन नॅशनल पोलीस’चा किताब जिंकला आहे.
२९ वर्षांची रोसीलीन ही एका मुलीची आई आहे. घराची जबाबदारी आणि काम या दोघांमधलं संतुलन राखत एका सौंदर्य स्पर्धेचा भाग होणं ही नक्कीच साधी गोष्ट नव्हती. महिला पोलीस कडक स्वभावाच्या असतात, इतर महिलांसारख्या त्या सुंदर नसतात किंवा सजण्याकडे त्याचा कलही नसतो असं अनेकजण मानतात. मात्र महिला पोलिसांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या या सौंदर्यस्पर्धेनं स्वत:कडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोनही दिला असंही ती म्हणाली. ही सौंदर्यस्पर्धा जिंकली असली तरी आपण पोलिस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावतच राहू असंही ती म्हणाली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 4, 2018 7:17 pm