X
X

लॉकडाउन मोडणाऱ्या महिलेला अडवताच ‘तिने’ पोलीस अधिकाऱ्याचा घेतला चावा

READ IN APP

लॉकडाउन मोडणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अडवलं.

सध्या संपूर्ण देश लॉकडाउन आहे. रेल्वे, बस ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहेच. पण त्याचबरोबरीने खासगी गाडयांनाही रस्त्यावर येण्यास बंदी आहे. काही वेळा औषध किंवा अन्य जीवनावश्यक वस्तूंची निकड भासत असल्याने घराबाहेर पडावे लागत आहे.

कोलकात्यात लॉकडाउन मोडणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अडवलं. त्यावरुन महिलेने पोलिसांशी हुज्जत घातली. संतापाच्या भरात ती महिला थेट पोलीस अधिकाऱ्याला जाऊन चावली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महिला या व्हिडीओमध्ये पोलीस अधिकाऱ्याला चावताना व त्याच्याशी हुज्जत घालताना दिसत आहे. पोलीस अधिकारी तिला लॉकडाउन असताना प्रवास करण्याचे कारण विचारत होता. त्यावर संतापलेली महिला थेट पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेली व त्याचा चावा घेतला.

दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. अ‍ॅप आधारीत टॅक्सी या महिलेने बुक केली होती. ही टॅक्सी पोलिसांनी अडवल्यानंतर वादावादीला सुरुवात झाली. या महिलेसोबत एक मित्र होता. आम्ही औषधे आणायला चाललो आहोत असे त्यांनी सांगितले. पण त्यांना प्रिस्क्रिप्शन दाखवता आले नाही असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

 

 

22

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on: March 26, 2020 10:36 am
Just Now!
X