जगभरात काल समस्त मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली, या ईदच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो प्रत्येकाच्या काळजाला भिडणारा होता. नमाज अदा करताना कोणताही अनूसुचित प्रकार घडू नये यासाठी मुस्लिम बांधवांच्या सुरक्षेसाठी देशभरात पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली. यावेळी तैनात करण्यात आलेले काही पोलीस मुस्लिम बांधवांना कोणताही त्रास होऊ नये याची पुरेपुरे काळजी घेत होते.

ईदच्या दिवशी काही मुस्लिम बांधव रस्त्यावरच नमाज अदा करत होते. त्यांच्या सुरक्षेसाठी दुतर्फा पोलीस उभे होते. वाऱ्यामुळे काहींच्या पायाखाली असलेली चटई उडून जात होती. नमाज पठण करत असल्याने या चटया निट करणं त्यांना शक्य नव्हतं तेव्हा मुस्लिम बांधवांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पोलीस स्वत: या चटया जागेवर व्यवस्थित करून ठेवत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘न्यूज नायक’ या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला १६००० हून अधिक शेअर्स मिळाले आहेत.

chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स
Vodafone Idea FPO, Vodafone-Idea,
विश्लेषण : अर्ज करावा की करू नये.. व्होडाफोन-आयडिया ‘एफपीओ’बाबत तज्ज्ञांचे मत काय?
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
Bengaluru firm workers hire goons to beat strict colleague arrested video viral
कामाचा दबाव टाकणाऱ्या व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांनी गुंडांच्या मदतीने केली बेदम मारहाण; पाहा धक्कादायक Video