मंदिरं खुली करा अशी मागणी भाजपानं केली होती, ही मागणी योग्य वाटते का असा पोल लोकसत्ता डॉट कॉमनं नुकताच घेतला होता. सुरूवातीला तुल्यबळ मतं पारड्यात असलेल्या या पोलच्या उत्तरार्धात मात्र, अचानकपणे मंदिरं उघडायला हवीत या दिशेने जनमत कलायला लागलं आणि ट्विटरवर तब्बल १६,७१६ जणांनी सहभाग नोंदवलेल्या या पोलमध्ये ७२.२ टक्के जणांनी मंदिरं उघडण्याच्या बाजुने कल दर्शवला तर २७.८ टक्के जणांनी मंदिरं न उघडण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्य असल्याच्या बाजुनं मतदान केलं.
विशेष महत्त्वाची बाब म्हणजे या पोलवर अनेक वाचकांनी ज्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत, त्या नक्कीच विचार करण्यासारख्या आहेत. त्यातल्या काही प्रतिक्रिया वानगीदाखल देत आहोत.
सगळ्या प्रतिक्रिया मूळ पोलच्या लिंकवर इथं वाचता येतील.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2020 10:51 am