30 November 2020

News Flash

अमेरिकन पॉप स्टारने घरात केली लक्ष्मीपूजा

मायलीने सोशल मीडियावर फोटो अपलोड केले

२४ वर्षांची मायली अमेरिकेतली प्रसिद्ध पॉपस्टार आहे.

अमेरिकन पॉप स्टार मायली सायरस हिने इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करून सगळ्यांनाचा आश्चर्याचा धक्का दिला आहे. मायलीने चक्क लक्ष्मीपूजा करतानाचे फोटो शेअर केले आहेत. आतापर्यंत सोशल मीडियावर बोल्ड फोटो अपलोड करून अनेकदा मायली वादात सापडली आहे. पण आता चक्क पूजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून तिने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

वाचा : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं..

वाचा : ओळखलंत का सर मला?

२४ वर्षांची मायली अमेरिकेतली प्रसिद्ध पॉपस्टार आहे. आपल्या मालूबी येथील घरातला फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. चौरंगावर लक्ष्मी आणि गणपतीच्या प्रतिमा, धूप ,अगरबत्ती, ताब्यांचा कलश, पाच फळे, तिर्थ आणि शंख अशी लक्ष्मी पूजेची मांडणी केलेला फोटो शेअर करत तिने तिच्या भारतीय चाहत्यांना धक्काच दिला. इतकेच नाही तर घरातील भारतीय बैठकीचा फोटोही तिने शेअर केला आहे. पहिल्यांदाच या पॉप स्टारने अशा प्रकारचे फोटो शेअर केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2017 7:53 pm

Web Title: pop star miley cyrus performed lakshmi puja at home
Next Stories
1 एलिझाबेथ राणीची ६५ वर्षांची कारकीर्द
2 Viral : थेट सरस्वती देवीशी ‘व्हाॅट्सअॅप’ वरून गप्पा!
3 viral : निर्वासितांनी देखील अमेरिकेला महान बनवले!
Just Now!
X