28 November 2020

News Flash

पोप फ्रान्स‍िस यांनी ‘लाइक’ केला बिकिनी घातलेल्या मॉडेलचा फोटो, सोशल मीडियावर खळबळ

एखाद्या धर्मगुरूने अशाप्रकाराचा फोटो लाइक केल्यामुळे इंटरनेट जगतात विविध चर्चा...

ख्रिश्चन समुदायाचे सर्वोच्च धर्मगुरु, पोप फ्रान्सिस सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. पोप फ्रान्सिस यांनी इंस्टाग्रामवर ब्राझीलच्या एका मॉडेलचा चक्क बिकिनीमधील फोटो लाइक केल्याचा स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल होत आहे. एखाद्या धर्मगुरूने अशाप्रकाराचा फोटो लाइक केल्यामुळे इंटरनेट जगतात याबाबत विविध चर्चा सुरू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Natalia Garibotto (@nataagataa)

व्हायरल होत आहे स्क्रीनशॉट :-
ब्राझीलची मॉडेल नतालिया गरिबोटो हिने आपला बिकिनीमधील एक फोटो पोप फ्रान्सिस यांनी लाइक केल्याचा दावा केला आहे. तो स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मॉडेल नतालिया गरिबोटो ही स्कूल गर्लच्या वेशातील अत्यंत तोकड्या कपड्यांमध्ये दिसत आहे. पोप फ्रान्सिस यांनी आपला फोटो लाइक केल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल होत असल्याचं लक्षात येताच स्वतः नतालिया गरिबोटो हिनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पोप यांनी लाइक केलेल्या स्क्रीनशॉटवर “किमान आता मी स्वर्गात जाईन”, अशी मजेशीर प्रतिक्रिया नतालिया गरिबोटो हिने दिली आहे. पोप फ्रान्सिस यांनी अशाप्रकारचा फोटो लाइक केल्यामुळे सोशल मीडियावर अनेकजण विविध प्रतिक्रिया देत आहेत. युजर्सकडून मोठ्या संख्येने कमेंट येत असून त्यामुळे ट्रोल झाल्यानंतर पोप यांच्या अकाउंटवरुन हा फोटो ‘अनलाइक’ करण्यात आला आहे. दरम्यान, हा फोटो अनावधानाने लाइक करण्यात आला होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नतालियाचे इंस्‍टाग्रामवर 20 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर आहेत. तर, अनेकजण तिच्या प्रायव्हेट वेबसाइटचेही सदस्य आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 9:38 am

Web Title: pope francis allegedly likes bikini model photo on instagram creates buzz sas 89
Next Stories
1 Video : समुद्रकिनारी आराम करत होते पर्यटक; अचानक कोसळली दरड अन्…
2 “भाजपा हिंदू-मुस्लीम करु लागल्यावर समजून जावे की देशात निवडणूक आहे”
3 विमानात महिला पायलट पाहून आजीबाईंना वाटलं आश्चर्य!; क्षणात दिली भन्नाट प्रतिक्रिया
Just Now!
X