News Flash

पॉर्न बघण्याची भारतीयांची आवडती वेळ माहित्येय का?; गुगलचा खुलासा

पॉर्नबद्दल सर्वाधिक सर्च करणाऱ्या राज्यांची यादीही गुगलच्या डेटामधून समोर आली असून यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे

सर्वाधिक पॉर्न सर्च करणाऱ्या राज्यांची यादीही गुगलच्या डेटामधून समोर आलीय. (प्रातिनिधिक फोटो, मूळ फोटो पिक्साबेवरुन साभार)

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास मुंबई पोलिसांनी अटक केली. पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि प्रसारण केल्याच्या आरोपाखाली कुंद्रा यांना अटक करण्यात आली. मढ येथे पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये केलेल्या कारवाईचे धागेदोरे राज कुंद्रांपर्यंत येऊन पोहचले आणि त्यांच्याविरोधात ठोस पुरावे उपलब्ध असल्याने तेच या पॉर्न प्रकरणाचे मुख्य आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. सध्या कुंद्रा हे भायखळ्यातील तुरुंगामध्ये आहे. या प्रकरणामुळे भारतातील पॉर्न चित्रपट आणि त्यांच्यावरील बंदी, कायदे, नियम याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र असं असतानाच गुगलच्या डेटामध्ये मात्र भारतीय मोठ्या संख्येने पॉर्न पाहत असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे भारतीय कोणत्या वेळेस सर्वाधिक पॉर्नसंदर्भात सर्च करतात याची आकडेवारीही समोर आलीय.

नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

राज कुंद्रा यांना १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली असली तरी पॉर्नसंदर्भात भारतीयांनी गुगल करण्याबद्दलचा डेटा हा त्या तारखेच्याआधीपासूनच एका विशिष्ट प्रकारचा ट्रेण्ड फॉलो करत असल्याचे दिसते. गुगल ड्रेण्डवर १४ जुलै ते २१ जुलैदरम्यानचा म्हणजेच आठवड्याभराचा डेटा पाहिल्यास लक्षात येतं की भारतीय रात्री पॉर्नसंदर्भात सर्वाधिक सर्च करतात. त्यातही रात्री दीड वाजता पॉर्नबद्दल सर्च करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण सर्वाधिक आहे. १४ जुलै ते २१ जुलैदरम्यान रोज रात्री दीडच्या सुमारास पॉर्न या टर्मबद्दल सर्वाधिक सर्च झाल्याचं दिसून येतं. रात्री साडे नऊपासून पॉर्नसंदर्भातील सर्चचा ग्राफ वर जाऊ लागतो आणि दीडच्या आसपास उच्चांक गाठतो. त्यानंतर पहाटे साडेपाचपासून ग्राफ पुन्हा खाली जात असल्याचं गुगल ट्रेण्डमध्ये दिसतं.


नक्की पाहा >> ‘ब्रा’च्या साईजमुळे हॉलवरच लग्न मोडतं तेव्हा…; जाणून घ्या नक्की काय घडलं

तर पॉर्न ही टर्म सर्वाधिक सर्च करणाऱ्या राज्यांमध्ये आश्चर्यकारकरित्या पूर्वेकडील राज्य आघाडीवर असल्याचं चित्र या ट्रेण्डमधून दिसून येत आहे. मणिपूर, मिझोरम आणि नागालँड ही तीन राज्ये पॉर्नसंदर्भात सर्च करण्यामध्ये अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर आहेत त्या खालेखाल टॉप पाचमध्ये असणारी अन्य दोन राज्येही पूर्वेकडील राज्यांपैकीच आहेत. अरुणाचल प्रदेश चौथ्या तर आसाम पाचव्या स्थानी आहे. त्या खालोखाल मेघालय, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरचा क्रमांक सर्वाधिक पॉर्न सर्च करणाऱ्या राज्यांच्या यादीत आहे.

नक्की वाचा >> पॉर्न सिनेमा प्रकरण : कुंद्रांच्या अटकेनंतरचे Google Search पाहून व्हाल थक्क; महाराष्ट्र आघाडीवर

११ व्या क्रमांकावर पंजाब, १२ व्या क्रमांकावर त्रिपुरा, १३ व्यावर पश्चिम बंगाल, १४ व्या स्थानी आंदमान निकोबार, १५ व्या स्थानी गुजरातचा समावेश आहे. उत्तर प्रदेश (१६), उत्तराखंड (१७), राजस्थान (१८), बिहार (१९), छत्तीसगड (२०) या राज्यांचा अव्वल २० मध्ये समावेश आहे. झारखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्ली, ओडिशा ही पुढील पाच राज्य आहेत. या यादीमध्ये महाराष्ट्र २६ व्या स्थानी आहे. महाराष्ट्राखालोखाल गोवा, दादरा नगर हवेली, केरळ आणि दिव दमण यांचाही अव्वल ३० मध्ये समावेश आहे.

नक्की वाचा >> “Porn Vs Prostitution वर बोलूयात, कॅमेरासमोरच्या सेक्ससाठी…”; राज कुंद्रांचं ‘ते’ ट्विट व्हायरल

या ट्रेण्डमधून रात्रीच्या वेळेस भारतीय मोठ्या संख्येने पॉर्नसंदर्भात सर्च करत असल्याचं स्पष्ट होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 6:49 pm

Web Title: porn search by indians in maximum at 1 30 am in night shows google trend data scsg 91
टॅग : Google,Social Viral
Next Stories
1 …अन् चक्क त्याने जेसीबी थांबवून लहान मुलांच्या खेळण्यात माती ओतली; व्हिडीओ व्हायरल
2 Video: विमानापेक्षा वेगवान ट्रेनचं उद्घाटन… पाहा चीनच्या Maglev ट्रेनची पहिली झलक
3 २४ जुलैला काय घडणार?; पृथ्वीजवळून जाणाऱ्या स्टेडियमएवढ्या आकाराच्या लघुग्रहावर ‘नासा’चं लक्ष
Just Now!
X