नावात काय आहे? असं आपण बऱ्याचदा म्हणतो. पण कधी कधी नावातही बरंच काही दडलं असतं. भारतासह जगभरात काही अशी गावं, जागा आहेत ज्यांच्या नावात ‘भलताच’ अर्थ दडला आहे. त्यांच्या नावात दडलेला ‘नेमका’ अर्थ शोधून एका पॉर्न वेबसाईटनं या भागात राहणाऱ्या लोकांना आपल्या वेबसाईटचा फ्री अॅक्सेस दिला आहे. तामिळनाडूमधल्या ‘कंबम’ भागाला या वेबसाईटनं ‘ऑफिशल प्रीमियम प्लेसेस’ जाहीर केलं आहे. त्यामुळे या वेबसाईटवरचे अडल्ट फिल्म येथील लोकांना पाहता येणार आहे.
वाचा : समुद्रात हरवला कॅमेरा, पाहा तीन वर्षांनी काय झालं
‘पॉर्नहब’नं जगभरातील ५० जागांना ‘प्रीमियम प्लेसेस’ म्हणून घोषीत केलंय. ज्या जागांचा उच्चार किंवा स्पेलिंगमधून द्वैअर्थ निघतो अशा जागांना ‘प्रीमियम प्लेसेस’ म्हणून जाहीर केलंय. त्यामुळे या भागातील लोकांना कोणतंही शुल्क न भरता ही वेबसाईट पाहता येणार असल्याचं अनेक इंग्रजी वर्तमानपत्रांनी म्हटलं आहे. ‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार तामिळनाडूतील ‘कंबम’ व्यतिरिक्तही यात हिमाचल प्रदेशमधल्या ‘पू’ आणि आसाममधल्या ‘चुतीया’ या भागांचाही ‘प्रीमियम प्लेसेस’मध्ये समावेश करण्यात आला आहे.
वाचा : ४८ वर्षे सोबत राहील्यानंतर त्यांनी नातवंडांसमोर केले लग्न
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 31, 2018 12:40 pm