डान्सिंग अंकल म्हणून प्रसिद्ध झालेले संजीव श्रीवास्ताव तुम्हाला आठवत असतीलच. अल्पावधीतच त्यांच्या डान्सचे अनेक  चाहते झाले होते. पण सध्या एका डान्सिंग अंकलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. डान्सिंग अंकल संजीव श्रीवास्तव यांचे लोक चाहते होते मात्र या डान्सिंग अंकलला पाहून लहान मुले घाबरली आणि स्टेज सोडून पळून गेल्याचे या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या डान्सिंग अंकलला पाहून तुम्ही हसू थांबवू शकणार नाहीत. अभिनेता प्रभू देवा याच्या ‘मुकबला’ या गाण्यावर त्या अंकलने डान्स केला आहे. लोक सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आहेत. या डान्सिंग अंकलच्या पाठीमागे मुले डान्स करत आहे. त्या डान्स करणाऱ्या अंकलचे स्टेप पाहून मुले घाबरल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मुले स्टेजवरून घाबरून उतरल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यापासून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेटीझन्स यावर चवीने चर्चा करत आहेत. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे याबाबत काहीही माहिती मिळाली नाही.

पाहा व्हिडीओ –