News Flash

VIDEO : जेव्हा मस्करीची कुस्करी होते! अपघातातून सुदैवानं वाचली

बस अर्धा इंच जरी पुढे गेली असती तर नक्कीच या मुलीचं डोकं बसच्या चाकाखाली आलं असतं. या प्रकरणात धक्का देणाऱ्या मुलीची चौकशी करण्यात येत आहे.

पोलंड पोलिसांनी एक सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केलं आहे.

मस्करीची कधी कुस्करी होईल काही सांगता येत नाही. मैत्रिणीनं केलेली मस्करी १७ वर्षांच्या मुलीच्या अक्षरश: जीवावर बेतली. तिनं मस्करीत दिलेल्या धक्क्यामुळे तिची मैत्रीण बसखाली आली. सुदैवानं बसचालकानं वेळीच ब्रेक लावल्यानं ती वाचली. जर काही इंच बस पुढे सरकली असती तर नक्कीच बसखाली चिरडून या मुलीचा मृत्यू झाला असता.

पोलंड पोलिसांनी एक सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केलं आहे. दोन मुली रस्त्यावरून हसत खेळत चाललेल्या या फुटेजमध्ये दिसत होत्या. काही दूर अंतर चालून गेल्यावर त्यातल्या एका मुलीनं आपल्या मैत्रीणीला खांद्यानं धक्का दिला, धक्का लागल्यावर ती मुलगी फुटपाथवरून खाली पडली. मागून वेगानं बस येत होती. सुदैवानं चालकाला मिररमध्ये मुलगी पडल्याचं दिसली आणि त्यानं प्रसंगावधानता दाखवून ब्रेक लावला. बस अर्धा इंच जरी पुढे गेली असती तर नक्कीच या मुलीचं डोकं बसच्या चाकाखाली आलं असतं. या प्रकरणात धक्का देणाऱ्या मुलीची चौकशी करण्यात येत आहे. तिनं हे कृत्य जाणीवपूर्वक केलं असल्याचं कबुल केलं तर मात्र तिला १ वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 3:39 pm

Web Title: prank goes wrong shocking footage shows the girl falling into the road as the big bus passes
Next Stories
1 VIDEO : आजकल पाँव जमीं पर नहीं रहते मेरे, वेडिंग फोटोग्राफरचा अॅडव्हेंचरस क्लिक
2 कोट्यवधींची संपत्ती, व्यवसाय लाथाडून २४ वर्षीय CA झाला जैन साधू
3 ‘या’ रेसिपीमुळे सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकार
Just Now!
X