News Flash

मुलायम-अखिलेश सायकलवरुन भांडताना प्रतीक यादवची ५ कोटींच्या गाडीतून सवारी

प्रतीक सिंह यादवच्या कारचे नाव ब्लू बोल्ट असे आहे.

आपली कार ब्लू बोल्ट आणि कुत्रा ब्राऊनीसोबत प्रतीक सिंह यादव ( संग्रहित छायाचित्र)

उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंह आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. दोघांपैकी नेमकं कुणाकडे पक्षाचे चिन्ह ‘सायकल’ राहील याचा निर्णय निवडणूक आयोगाने राखून ठेवला आहे. एकीकडे सायकलचे चिन्ह कुणाकडे राहील याची गरमागरम चर्चा रंगलेली असताना मुलायम सिंह यादव यांचा मुलगा आणि अखिलेश यांचा सावत्र भाऊ प्रतीक सिंह मात्र पाच कोटी रुपये किंमत असलेली लॅंबोर्गिनी ही कार चालवत असताना दिसला आहे. आपली कार आणि कुत्र्याचा फोटो टाकल्यानंतर सोशल मिडियावर प्रतीकच्या लॅंबोर्गिनीच चर्चा होत आहे. आपला कुत्रा ब्राऊनी आणि निळ्या रंगाची लक्झरी कार यांचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर टाकला आहे. एकीकडे आपले वडिल आणि भाऊ यांच्यामध्ये सायकलसाठी वाद आहे परंतु प्रतीक मात्र आपल्या लॅंबोर्गिनीसोबत खुश असल्याची प्रतिक्रिया ट्विटरवरुन देण्यात येत आहे.

प्रतीक हा राजकारणात सक्रिय नाही. त्याची पत्नी अपर्णा ही राजकारणामध्ये सक्रिय आहे. प्रतीकची पत्नी अपर्णा ही लखनौ कॅंटॉनमेंटमधून विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहण्याच्या विचारात आहे. प्रतीक सहसा कुठल्याही राजकीय व्यासपीठावर दिसत नाही. तो आपला रिअल इस्टेटचा व्यवसाय आणि जीमच्या व्यवसायात व्यस्त असतो. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचे जीममध्ये व्यायाम करतानाचे, आपल्या कुत्र्यासोबतचे फोटो असतात. तो राजकारणापासून स्वतःला दूर ठेवतो असे म्हटले जाते. आपल्या लॅंबोर्गिनीचे त्याने अनेक फोटो आणि व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याने त्याच्या कारचे नाव ब्लू बोल्ट असे ठेवले आहे.

त्याने आपल्या कारसोबतचा फोटो मागील आठवड्यामध्ये इन्स्टाग्रामवर टाकला आहे. तसेच कारचा व्हिडिओदेखील टाकला आहे. हा फोटो टाकल्यापासून ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. आपल्या वडिलांच्या आणि भावाच्या सायकलच्या भांडणापासून प्रतीक अलिप्त दिसतोय असे निरीक्षण काही लोकांनी मांडले आहे. जर प्रतीक यादवला महागडी कार परवडत असेल तर इतरांच्या पोटात दुखण्याचे कारण काय अशी देखील प्रतिक्रिया काही लोकांनी टाकली आहे. उत्तर प्रदेश निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या असताना अद्याप सायकलचे चिन्ह कुणाकडे जाईल याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने राखून ठेवला आहे. १७ जानेवारी रोजी ‘सायकल’ मुलायम यांना मिळणार की अखिलेश यांना मिळणार याचा निर्णय समजणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2017 7:30 pm

Web Title: pratik singh yadav mulayam singh yadav akhilesh yadav lamborghini car up election
Next Stories
1 या घरात भरून राहिली शतकापूर्वीची फ्रेंच कलासक्ती
2 व्हाॅट्सअॅप मेसेजेस् सुरक्षित नाहीत?
3 VIRAL VIDEO : ‘हा’ हेअरस्टाईलिस्ट केस कापत नाही तर जाळतो!
Just Now!
X