News Flash

अस्खलित इंग्रजीमुळे गर्भवती भारतीय महिलेला व्हिसा नाकारला?

तिला स्कॉटलंडला नवऱ्याकडे जायचे होते

अॅलेक्सझँड्रियाला आता व्हिसासाठी पुन्हा अर्ज करण्यासाठी सांगण्यात आला आहे.

इंग्रजी भाषेच्या अज्ञानामुळे एखाद्याला व्हिसा नाकरल्याचं तुम्ही ऐकलं असेल. इंग्रजी बोलता येत नसल्यानं व्हिसा नाकारल्या गेल्याचा वाईट अनुभव अनेकांना येतो, पण अस्खलित इंग्रजी येत असल्यानं व्हिसा नाकारला गेल्याचं तुम्ही क्वचितच ऐकलं असेल. अॅलेक्सझँड्रिया रिंन्टो या २२ वर्षीय भारतीय महिलेला अस्खलित इंग्रजी येत असल्यानं व्हिसा नाकारला गेल्याच समोर आलं आहे. अॅलेक्सझँड्रियाला आपल्या नवऱ्याकडे स्कॉटलंडला राहायला जायचे होते. वर्षभरापूर्वी तिचे लग्न झाले. पहिला नाताळ नवऱ्यासोबत साजरा करण्याची तिची इच्छा होती. म्हणूनच तिने व्हिसासाठी अर्ज केला होता. पण, अनपेक्षित कारणानं तो नाकारला गेला.

‘युकेचा व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया किचकट आणि अवघड असल्यानं मी इमिग्रंट लॉयरची मदत घेतली. त्यांच्या सल्ल्यानं मी माझी आवश्यक कागदपत्र आणि इंग्रजी भाषेची परीक्षा दिली. त्यामुळे लवकरच माझ्या व्हिसाचं काम होईल याची मला खात्री होती. पण, मला आता व्हिसा नाकारला गेल्याचं पत्र आलं. मी त्या परीक्षेसाठी अपात्र ठरली असल्याचं त्यात नमूद केलं होतं. या परीक्षेसाठी मी ‘ओव्हर क्वॉलिफाईड’ असल्याचं सांगत मला पहिल्या टप्प्यातील परीक्षा देण्याकरता सुचवण्यात आलं आहे. माझं इंग्रजी अस्खलित असल्यानं मला व्हिसा नाकारला गेल्याचं’ ‘डेली मेल’ला दिलेल्या मुलाखतीत तिनं आपल्यासोबत काय घडलं हे सांगितलं.

अॅलेक्सझँड्रियाला आता व्हिसासाठी पुन्हा अर्ज करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. मुळची मेघालयाची असलेल्या अॅलेक्सझँड्रियाला व्हिसाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बंगळुरूमधल्या हॉटेलमध्ये राहावं लागत आहे. अॅलेक्सझँड्रिया संगीतकार आहे. इंग्रजी भाषेतील पदवीही तिच्याकडे आहे. दरम्यान इंग्रजी भाषा येत असूनही याच कारणासाठी व्हिसा नाकारला गेल्यानं तिच्या नवऱ्यानेही नाराजी व्यक्त केली आहे. असं असलं तरी युकेमध्ये स्थायिक होण्यासाठी अधिकृत इंग्रजी भाषा परीक्षा चाचणी केंद्रातूनच परीक्षा देणं अनीवार्य आहे. इमिग्रंट नियमावर या केंद्राची माहिती दिलेली असते. इमिग्रंट नियमाप्रमाणे जी परीक्षा देणं अपेक्षित होतं ती तिने दिलेली नाही. तिची इंग्रजी चाचणी ही नियमबाह्य आहे, त्याचबरोबर अर्जासाठी आवश्यक असणारे काही महत्त्वाचे दस्ताऐवजही तिच्याकडून देण्यात आलेले नाहीत, असं व्हिसा विभागातील सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 3:13 pm

Web Title: pregnant indian wife refused entry to the uk because her english is too good
Next Stories
1 Video : भारतातल्या ‘या’ रेस्तराँमध्ये वेटरऐवजी यंत्रमानव देणार सेवा
2 International tea day : चहाबद्दलच्या या रंजक गोष्टी माहितीये का?
3 सेल्फीचा नाद भोवला, रेल्वेच्या धडकेत मुलगी गंभीर जखमी
Just Now!
X