अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. मागील काही दिवसांपासून उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उनच्या भेटीमुळे ट्रम्प चर्चेत होते. मात्र काल ट्रम्प सहभागी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून ते पुन्हा एकदा सोशल नेटवर्कींगवर चर्चेचा विषय ठरले आहेत. एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ट्रम्प यांनी जगप्रसिद्ध ‘अॅपल’ कंपनीचे सीईओ टीम कूक यांचा उल्लेख टीम अॅपल असा केला. विशेष म्हणजे टीम हे ट्रम्प यांच्या बाजूला बसलेले असतानाचा हा प्रकार घडला. सध्या या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल नेटवर्कींगवर व्हायरल होताना दिसत आहे.

बुधवारी ट्रम्प यांनी देशातील सर्व बड्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक बोलवाली होती. अमेरिकन कंपनींमध्ये काम करणाऱ्या कामगारांसदर्भातील धोरणांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी ट्रम्प यांच्यासोबत अॅपलचे सीईओ टीम कूक आणि ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘मी टीमला अनेकदा अमेरिकेसाठी काहीतरी करण्यासंदर्भात सांगयचो. तर त्याने माझे म्हणणे ऐकत आता अमेरिकेत मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. मी यासाठी ‘टीम अॅपल’चा आभारी आहे.’ ट्रम्प यांनी घातलेल्या या गोंधळाचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ट्रम्प यांनी केलेल्या या चुकीनंतर Tim Apple हा शब्द ट्विटवर ट्रेण्ड होताना दिसता. अनेकांनी या प्रसंगावरुन ट्रम्प यांच्यावर विनोदी ट्विट करत यांना ट्रोल केले आहे. तर काहींनी बाजूलाच बसून आपले चुकीने नाव ऐकावे लागल्याबद्दल टीम कूक यांच्याबद्दल सहानभूती वाटत असल्याचे ट्विटवर म्हटले आहे. पाहुयात असेच काही व्हायरल ट्विटस

टीम अॅपल

मग बाकीच्यांची नावं अशी घ्यावी लागतील

नवीन ट्रेण्डप्रमाणे नावं

टीम अॅपल तर प्रेसिडंट ऑरेंज

हे असं पण

आणखीन काही नावं

थॉमस लाइटबल्ब वगैरे वगैरे

बोलताना नावांमध्ये चूक करण्याची ट्रम्प यांची काही काही पहिली वेळ नाही या आधीही ट्रम्प यांनी अनेकदा चुकीचे शब्द वापरल्याची उदाहरणे आहेत.