पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.  मोदी आज नेमकं काय सांगणार, याबाबत देशवासियांना उत्सुकता लागली आहे. मोदी पाच वाजता बोलणार या वृत्तानंतर ते आज नक्की काय बोलणार यासंदर्भात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

सध्या देशातील करोनाची परिस्थिती, म्युकरमायोकोसिसचा धोका, देशभरातील लसीकरण मोहीम, शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेची वर्तवलेली शक्यता तसेच, अनेक राज्यांमध्ये सुरू झालेली अनलॉक प्रक्रिया आदी प्रमुख मुद्यांवर मोदी बोलू शकतात, असा अंदाज लावला जात आहे.

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Supreme Court understanding of Ajit Pawar group regarding use of clock symbol
वृत्तपत्रात निवेदन ठसठशीत छापा! सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला समज

मात्र त्याचवेळी या घोषणेनंतर सोशल नेटवर्किंगवर नेहमीप्रमाणे मिम्सची लाट आल्याचं चित्र दिसत आहे. काहींनी पाच वाजता म्हणजे फार काही गंभीर नसेल कारण मोदी गंभीर घोषणा आठच्या भाषणात करतात असं म्हटलं आहे तर काहींनी काय बोलणार पंतप्रधान यासंदर्भात विचार करताना धडकी भरत असल्याचं म्हटलं आहे. वेगवेगळे मिम्स व्हायरल झाले असून मोदी नक्की काय बोलणार याचा अंदाज नेटकरी मिम्सच्या माध्यमातून लावत आहेत. पाहुयात काही व्हायरल मिम्स…

१) तयार आहात ना?

२) घाबरण्याचं कारण नाही पाच आहे आठ नाही

३) काय अडचण आहे

४) धडधड वाढली

५) देवा

६) अंदाज लावताना तज्ज्ञ

७) प्रार्थना

८) समर्थक

९) रिस्क आहे

१०) टास्क असणार

यापूर्वी मोदींनी देशाला उद्देशून एप्रिल महिन्यात केलेल्या भाषणामध्ये राज्यांना आवाहन केलं होतं. लॉकडाउनचा कमीत कमी वापर करण्यासंदर्भातील विचार करावा असं मोदींनी त्यावेळी म्हटलं होतं.