04 March 2021

News Flash

ब्रिटनच्या राजघराण्यात ‘पाहुणा’ येणार; युवराजांवर शुभेच्छांचा वर्षाव

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

ब्रिटनचे युवराज विल्यम आणि युवराज्ञी केट यांच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. राजघराण्यात बाळाचे आगमन होणार असल्यानं या दाम्पत्यावर ट्विपल्सनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. राजघराणं आनंदानं फुलून गेलं आहे. युवराज विल्यम्स आणि केट यांचा २०११ मध्ये विवाह झाला होता. २०१३ मध्ये त्यांना मुलगा झाला. २०१५ मध्ये राजघराण्यात परीचा जन्म झाला. त्यानंतर आता तिसऱ्या बाळाचं राजघराण्यात आगमन होणार आहे.

राजघराणं बाळाच्या आगमनाच्या चाहुलीनं आनंदून गेलं आहे. ब्रिटीश पॅलेसनं ट्विट करून ही ‘गुड न्यूज’ दिली आहे. या ट्विटला १ लाख लाइक्स आहेत. अवघ्या सहा तासांत ४० हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. प्रकृती ठिक नसल्यानं केटनं सर्व सोहळे रद्द केल्याचे प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे. या बातमीची केवळ इंग्लंडमध्येच नाही तर जगभरात चर्चा सुरु आहे. ‘रॉयलबेबी’ जन्माच्या आधीपासूनच ट्रेंड व्हायला लागली आहे. लवकरच आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या पूर्ण होतील. त्यानंतर बाळाचं नाव काय ठेवायचं हे ठरवण्यात येईल. ट्विटरवर ही बातमी समजताच युवराजांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर केट आणि होणाऱ्या बाळाचं आरोग्य उत्तम राहो, यासाठी आपण प्रार्थना करत असल्याचं अनेकांनी म्हटलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 4:39 pm

Web Title: prince william and kate middleton are expecting third royal baby many reactions on twitter
Next Stories
1 ६० तास, १४० किलोमीटरच्या पायी प्रवासात मूत्र प्राशन करून ‘तो’ जगला
2 पाहुण्यांचा एकटेपणा घालवण्यासाठी हॉटेलची ‘गोल्डन’ ऑफर
3 Teachers Day 2017: गुगलची डुडलद्वारे गुरूवंदना!
Just Now!
X