News Flash

रोहींग्यांच्या शिबिरात गेलेल्या प्रियांकाला नेटीझन्सने केले ट्रोल

इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर केला फोटो शेअर

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आणि युनिसेफची ब्रँड अँबेसिडर प्रियांका चोप्राला सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. आता यामागचे नेमके कारण काय तर, बांग्लादेशमधील रोहिंग्या निर्वासितांची भेट घेण्यासाठी गेली होती. याचा फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केल्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावेळी तिने लिहीले, मी रोहिंग्या निर्वासितांच्या शिबिरातील दौऱ्यावर आले आहे. या शिबिरातील माझे अनुभव ऐकण्यासाठी मला इन्स्टाग्रामवर फॉलो करा. या लोकांची काळजी करण्याची आवश्यकता असून आपण त्यांची काळजी घ्यायला हवी असेही तिने यामध्ये म्हटले आहे.

तिच्या या पोस्टवर असंख्य कमेंटस आल्या असून त्यामध्ये अनेकांनी तिच्यावर टिका केली आहे. चॅरीटीची सुरुवात आपल्या घरातून होते, तेव्हा प्रियांका तु रोहिंग्यांच्या किती मुलांना दत्तक घेतले आहेस? असा प्रश्नही विचारला आहे. काहींनी काश्मिरी पंडितांना कधी भेटायला गेलीस का असाही प्रश्न उपस्थित केला आहे. काही जणांनी तिच्या या दौऱ्याचा राजकीय स्टंट असा उल्लेख केला आहे. मात्र प्रियांकानेही आपल्या या दौऱ्याचा असा काही अर्थ निघेल असा विचार केला नसेल. २०१० मध्ये प्रियांकाला युनिसेफची ब्रॅंड अँबेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. याअंतर्गत ती जगातील समस्याग्रस्त बालकांसाठी काम करु शकेल. या अंतर्गतच ती मागील वर्षी सिरीयामध्ये गेली होती. ब्रिटनमध्ये अभिनेत्री मेगन मार्कल आणि प्रिन्स हॅरी यांच्या लग्नाला उपस्थित राहील्यानंतर प्रियांका थेट बांग्लादेशमध्ये गेली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2018 8:13 pm

Web Title: priyanka chopra visits rohingya camps in bangladesh for unicef
Next Stories
1 अस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का ?
2 दिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर
3 आश्चर्य! विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली
Just Now!
X