सोशल मीडियावर बंदुकीसोबत व्हिडीओ बनवणं एका महिला पोलिस कॉन्स्टेबलला चांगलंच महागात पडलंय. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर खाकी वर्दी गमावलेली ‘रिवॉल्वर रानी’ सध्या सोशल मीडियावर स्टार बनलीय. आग्रा पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका मिश्रा हिने रविवारी राजीनामा दिल्यानंतर १२ दिवसांनी एसएसपी मुनीराज जी. यांनी तिचा राजीनामा मंजूर केलाय. सोशल मीडियावर तिच्या व्हायरल व्हिडीओवर लोकांच्या कमेंटमुळे नाराज झाल्यानंतर तिने हा राजीनामा दिला. त्यामुळे प्रियंका मिश्रा यापुढे पोलीस विभागात काम करू शकणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कानपुरमध्ये राहणारी प्रियंका मिश्रा ही नुकतीच २०२० मध्ये पोलीस विभागात कॉन्स्टेबल पदावर रुजू झाली होती. झाशीमधल्या ट्रेनिंगनंतर एमएम गेट इथे तिची ड्यूटी लागली होती. अशात तिने पोलीस वर्दीवर असताना एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने हातात बंदूक पकडत एका डायलॉगवर लिपसिंग करताना दिसून आली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर वरिष्ठांनी रिवॉल्वर रानी प्रियंका मिश्रावर कारवाईचे आदेश दिले. सोशल मीडियावर लोकांकडून तिच्या या व्हिडीओवर वेगवेगळे कमेंट्स येऊ लागले. याला कंटाळून प्रियंका मिश्रा हिने ३१ ऑगस्ट रोजी आग्राचे एसएसपी मुनीराज जी. यांच्याकडे तिचा राजीनामा सोपवला. त्यानंतर १२ दिवसांनी गेल्या रविवारी एसएसपी मुनीराज यांनी राजीनामा स्विकारला.

आणखी वाचा : बापरे! मुलाकडून असं काम करून घेतलं की डिलीट करावं लागलं YouTube चॅनल

‘रिवॉल्वर रानी’ प्रियंका मिश्रा हिने राजीनाम्यासोबतच पोलीस विभागात १.५२ लाख रूपये जमा केले आहेत. पोलीस वर्दीसोबतच तिने किट देखील पोलीस खात्यात जमा केले आहे. सोबतच प्रशिक्षण घेण्यासाठी लागलेला खर्च पुन्हा परत मिळण्यासाठी अर्ज केला आहे.

आणखी वाचा : दूरदर्शनचा आज ६२ वा वाढदिवस; ट्विटरवर झळकल्या अविस्मरणीय आठवणी

प्रियंका मिश्राने कॉन्स्टेबल पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर मात्र तिची फॅन फॉलोइंग वाढू लागली आहे. ज्यावेळी तिने हा व्हिडीओ तयार केला होता, त्यावेळी इन्स्टाग्रावर तिचे १५०० इतके फॉलोअर्स होते. आजच्या घडीला जवळपास ५० हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. प्रियंका मिश्राने या व्हिडीओच्या नादात खाकी वर्दी गमवावी लागली असली तरी सोशल मीडियावर लोक तिचं कौतुक करू लागले आहेत. त्यामुळे ती सोशल मीडियावरील सेलिब्रिटी बनली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka mishra constable resign hit social media viral videos prp
First published on: 16-09-2021 at 15:00 IST