देशभरात सध्या उन्हाचा पारा वाढलेला पहायला मिळतोय, अनेक ठिकाणी तर तापमानाने अर्धशतक ओलांडल्याचं चित्र आहे. या भीषण गरमीपासून बचावासाठी नागरीकांकडून निरनिराळ्या शक्कल लढविल्या जात आहेत. कार थंड रहावी यासाठी काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या अहमदाबादमध्ये सेजल शहा या महिलेने आपल्या Toyota Corolla Altis या लाखो रुपयांच्या लक्झरी कारला शेणाने सारवलं होतं. लगेचच त्यांच्या कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि याबाबत नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. पण, स्वतःची कार शेणाने सारवण्याची आता जणू क्रेझ आल्याचं दिसतंय. कारण, आता पुण्यातील एका डॉक्टरने आपल्या Mahindra XUV500 या गाडीला शेणाने सारवलं आहे.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

पुण्यातील नवनाथ दुधाळ हे मुंबईच्या टाटा कॅंसर हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ डॉक्टर आहेत. त्यांनी आपल्या Mahindra XUV500 ला शेणाने सारवलं आहे. ‘पुण्यात उन्हामुळे नागरीक हैराण झालेत, पण शेणाने सारवल्याने इतक्या उन्हाचाही गाडीवर काहीच परिणाम पडत नाहीये. कारमधील एसीचा वापरही आता मी थांबवलाय, पर्यावरणासाठी देखील ही चांगली बाब आहे, अशी प्रतिक्रिया दुधाळ यांनी याबाबत बोलताना दिली. सकाळ टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

दुधाळ यांनी गाडीच्या काचा आणि हेडलाईट व्यतिरिक्त सर्वत्र शेण फासलं आहे. तीन थरांमध्ये गाडीवर शेण सारवण्यात आलं असून एक महिन्यापर्यंत हे आवरण टिकू शकतं. यामुळे बाहेरील तापमानाच्या तुलनेत कारमधील तापमान 5 ते 7 अंश कमी असतं. एका महिन्यानंतर पाणी आणि सुती कापडाने शेण सहज साफ करता येतं. याशिवाय शेणामुळे गाडीवर कोणत्याही प्रकारचे डाग पडत नाही किंवा गाडीच्या रंगावरही काहीच परिणाम होत नाही. काही वेळासाठी कारमध्ये थोडाफार वास नक्कीच येत असतो, पण थोड्याच वेळात वास निघून जातो, असं दुधाळ म्हणाले. कर्करोग झालेल्यांना गोमुत्र आणि गायीच्या शेणामुळे होणाऱ्या फायद्याबाबत बरंच वाचन आणि अभ्यास केला आहे, त्यामुळेच गाडी शेणाने सारवण्याचा विचार डोक्यात आल्याचं दुधाळ यांनी सांगितलं.

अशाप्रकारे अजून किती जणांनी आपल्या कारला उन्हापासून बचावासाठी शेणाने सारवलं आहे याबाबत नेमकी माहिती नाही. मात्र कारवर गायीचं शेण लावल्यास कार थंड राहते हे अद्याप सिद्ध झालेलं नाहीये.