News Flash

पुणे पोलिसांनी घातलं कोडं…तुम्हाला सुटतंय का पाहा बरं!

पुणे पोलिस आपल्या भन्नाट ट्विट्ससाठी प्रसिद्ध आहेत.

राज्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. त्या अंतर्गत अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पुणे पोलीस लोकांनी नियम पाळावे यासाठी वेगवेगळ्या पद्धतींनी जनजागृती करत आहेत. त्यांचे ट्विट्स भरपूर व्हायरल होत आहेत आणि लोकांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

आत्ताही त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक कोडं घातलं आहे. कोडं असं आहे. एका पोलिसाने खालीलपैकी एका व्यक्तीला शिक्षा केली. कोणाला आणि का केली ते ओळखा पाहू.
आज सकाळी ९ वाजता- नितीन, अरुण, रिया आणि राहुल हे एका दुकानात जातात. दुकानदार नितीनला विचारतो, “कसे आहात?” अरुणला विचारतो, “अरे वा मिश्या ठेवल्या!” रियाला म्हणतो, “नमस्कार मॅडम!” तर राहुलला म्हणतो, “सिगरेट नाहीये.”

त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी रिप्लाय करत या कोड्याचं उत्तर दिलेलं आहे. पुणे पोलिसांसोबत मुंबई पोलीसही यात कमी नाहीत. करोनाच्या काळात नागरिकांकडून सर्व नियमांच पालन होत आहे का याकडे मुंबई पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत. नुकतंच मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून नागरिकांसाठी एक मेसेज दिला आहे. मुंबई पोलिसांचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.

मुंबई पोलिसांनी नुकत्यात रिलीज झालेल्या राधे सिनेमातील एका सीनचं मीम शेअर करत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या ट्विटमध्ये “जेव्हा नागरिक बिना मास्क घराबाहेर निघतात तेव्हा” असं म्हणत फोटो शेअर करण्यात आला आहे.ट्रेलरमधील एका सीनमध्ये रणदीप हुड्डाचा एक डायलॉग आहे. ‘आय लव्ह इट’. रणदीप हुड्डाच्या चेहऱ्याच्या जागी करोनाच्या व्हायरसचा फोटो लावून मुंबई पोलिसांनी तो शेअर केला आहे. यावर ‘आय लव्ह इट’ लिहण्यात आलं. म्हणजेच जर कुणी बिना मास्क बाहेर पडलं तर करोनाला बळी पडू शकतो असं यातून दर्शवण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 6:16 pm

Web Title: pune police tweeted a puzzle asked people to answer vsk 98
Next Stories
1 कमिन्सकडून PM Cares साठी ३७ लाख घेताना करोना Internal Matter असल्याचं मोदी सरकार विसरलं का?
2 Video : “करोना से डर नहीं लगता साहब पंखे से लगा है”; करोना रुग्णाची तक्रार व्हायरल
3 “मोदी प्रचारसभेत मास्क घालत नाहीत पण बंद दाराआड बैठक असताना मास्क घालतात”
Just Now!
X