ब्रिटनच्या राजघराण्यात एवढा प्रदीर्घ काळ सिंहासनावर राहिलेल्या पहिल्या सम्राज्ञीचा मान एलिझाबेथ (द्वितीय) यांना मिळाला आहे. गेल्या ६५ वर्षांपासून त्याच्या ब्रिटनच्या गादीवर आहेत. सहा फेब्रुवारी १९५२ मध्ये राजे जॉर्ज सहावे यांच्या मृत्यूनंतर त्या याच दिवशी सम्राज्ञी बनल्या होत्या.

एलिझाबेथ वयाच्या २६ व्या वर्षी सम्राज्ञी बनल्या. राजकन्या एलिझाबेथ यांचा राज्याभिषेकाचे त्यावेळी थेट दूरचित्रवाणीवरून प्रसारण करण्यात आले होते. राजघराण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच या सोहळ्याचे दूरचित्रवाणीवरून थेट प्रसारण करण्यात आले होते. राणी आणि प्रजा यांच्यातील संबंध यापुढे कसे असणार आहेत हेच या प्रक्षेपणाने दाखवून दिले. एलिझाबेथ यांचे व्यक्तीमत्त्व असामान्यच आहे. वयाच्या १८ व्या वर्षी या राजकन्येने राजाशी भांडून हट्टाने महिलांच्या सहायक प्रादेशिक सेवेत सहभागी झाल्या. तेथे त्यांनी लष्कराचे ट्रक चालवण्याचे काम केले. त्यासाठी ट्रकचे दुरुस्तीकाम शिकल्या. हे असे यापूर्वी कोणा राजघराण्यातील व्यक्तीने केले नव्हते. म्हणूच प्रत्येकाला त्या आपल्यातलीच एक वाटे.

आज त्यांनी इतिहास रचला. सलग ६५ व्या वर्षी त्यांची कारकिर्द अबाधित राहिली. या ६५ वर्षांच्या काळात त्यांनी अनेक वादळं पाहिलीत. आलेल्या प्रत्येक संकटांना तोंड देत आपली ६५ वर्षांची कारकिर्द त्यांनी अबाधित राखली.