News Flash

Video : गाडीच्या बोनेटवरच पोलिसांनी तयार केलं ऑमलेट

येथील तापमान ४० अंश सेल्शिअसच्याही पुढे

काही वर्षांपूर्वी टीव्हीवर एका जाहिरात आली होती. वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या गाडीच्या बोनेटवर अंड पडत आणि या अंड्याचे चक्क ऑमलेट बनतं. अनेकांना ही जाहिरात आठवत असेल. पण ही फक्त जाहिरात होती. गाडीच्या बोनेटवर अंड पडलं आणि ते फटक्यात फ्राय झालेलं आपण तरी नाही पाहिलं बुवा! असं अनेक जण म्हणतील. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र अशा गोष्टी प्रत्यक्षातही होतात यावर तुमचा विश्वास नक्की बसेल.

वाचा : रशियाचा ‘हीरो डॉग’, -२१ अंश तापमानात लहान मुलाचा जीव वाचवला

वाचा : दोन हजाराच्या नोटांनी सजवलेल्या गाडीमागचे व्हायरल सत्य उघड

ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँड पोलिसांनी फेसबुकवर एक व्हि़डिओ शेअर केला आहे. बाहेर उष्णताच एवढी आहे की गाडीच्या बोनेटवर ठेवलेल्या अंड्याचंही काही मिनिटांत ऑमलेट तयार होतं हे त्यांनी दाखवलं आहे. सध्या क्वीन्सलँडमध्ये तापमान वाढत चाललं आहे. आतापर्यंत येथे विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. पारा ४० अंश सेल्शिअसवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात येथलं तापमान वाढत चाललं आहे.
येथल्या पोलिसांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. पोलिसाने आपल्या गाडीच्या बोनेवटर तवा ठेवला आणि या तव्यावर चक्क ऑमलेट बनवलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत तीस लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

VIDEO: आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केला झकास म्युझिक व्हिडिओ

वाचा :  कर्जबुडव्यांना यापुढे विमान, बुलेट ट्रेनमध्ये बंदी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 10:30 am

Web Title: queensland police fried an egg on his police car
Next Stories
1 …तिचा गगनचुंबी थरार!
2 कर्जबुडव्यांना यापुढे विमान, बुलेट ट्रेनमध्ये बंदी
3 VIDEO: आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केला झकास म्युझिक व्हिडिओ
Just Now!
X