‘द आर्क रेडिओ स्टेशन’ ची रेडिओ जॉकी कॅस्सीडी प्रोक्टोर हिनं चालू कार्यक्रमात गोंडस बाळाला जन्म दिला आहे. कार्यक्रमादरम्यान तिला प्रसुती कळा सुरू झाल्या. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं यावेळी रेडिओ स्टेशनने रुग्णालयातूनच तिचा कार्यक्रम लाईव्ह करण्याची खास तयारीदेखील केली होती.

मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट श्रोत्यांसोबत शेअर करते. हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता. मला तो माझ्या श्रोत्यांसोबत शेअर करायचा होता. त्याचप्रमाणे माझ्या आय़ुष्यातील आनंदाचा क्षण मी श्रोत्यांसोबत वाटून घ्यावा अशी इतरांचीही इच्छा होती म्हणूनच रेडिओ स्टेशननं आधीच रुग्णालयातूनच कार्यक्रम लाईव्ह करण्याची खास तयारी केली असल्याचं तिनं बीबीसीला सांगितलं.

विषेश म्हणजे मुलाचा जन्म होण्याआधीच त्याचं नाव काय ठेवायचं यासाठी रेडिओवर वोटिंग घेण्यात आलं होतं. या दांपत्यानं निवडलेल्या १२ नावांवर वोटिंग सुरु होतं. अखेर जेमिसन या नावाला श्रोत्यांनी सर्वाधिक पसंती दिली आणि कॅस्सीडीचा ऑन एअर जन्मलेल्या बाळाचं जेमिसन असं नामाकरण करण्यात आलं.