एखादा सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्ती रांगेत उभी राहिलेली आपण क्वचितच पाहिली असेल. पण, राहुल द्रविड मात्र याला अपवाद ठरला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर राहुल द्रविड याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे. क्रिकेटपटू असताना आपल्या शांतपणा आणि संयमी वृत्तीसाठी तो प्रसिद्ध होता. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वैयक्तिक आयुष्यातही राहुल द्रविड तसाच साधेपणाने वागतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोच्या निमित्ताने याचा प्रत्यय येत आहे.

अॅपलच्या ‘प्रामाणिक’ ग्राहकांना सॅमसंगची भन्नाट ऑफर

एका विज्ञान प्रदर्शनामधला हा राहुल द्रविडचा फोटो आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी आपल्या मुलांसोबत तो रांगेत उभा होता. आपण सेलिब्रिटी आहोत, असा कोणताही अविर्भाव त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. एका सामान्य मुलांच्या पालकांप्रमाणे तो वागत होता. त्याचं वागणं अनुकरण करण्यासारखंच होतं. आपल्या मुलांनाही त्याने साधेपणाची शिकवण दिल्याचे यातून लक्षात येतं.

Video : म्हणून पोलीस स्टेशनमध्येच उडवला लग्नाचा बार

‘एका विज्ञान प्रदर्शनात आपल्या मुलांसोबत रांगेत उभा असलेला राहुल द्रविड. कोणताही दिखावा नाही, पेज-3 अॅटिट्यूड नाही, सेलिब्रिटी असल्याचा गर्व नाही, इतकंच काय मी सेलिब्रिटी आहे, याचा अविर्भाव नाही. इतर सामान्य आई-वडिलांप्रमाणे तो रांगेत उभा आहे.” अशी ओळ लिहून त्याचा फोटो एका ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आला आहे. हा फोटो जवळपास साडेपाच हजार लोकांनी रिट्विट केला आहे.