काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या एका फोटोची सध्या जोरदार चर्चा आहे. एका तरूणीने राहुल गांधी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. राहुल गांधी हे उत्तम वक्ता असून त्यांची भेट घेऊन मला खूपच आनंद झाला असं म्हणत या तरुणीने राहुल गांधींसोबतचा आपला फोटो शेअर केलाय. या फोटोनंतर तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी अनेकांचं कुतूहल जागं झालं. तिचं नाव नथालिया रामोस असून ती स्पॅनिश अभिनेत्री आहे. तिची आई ऑस्ट्रेलियन आहे तर वडील कार्लोस रामोस हे एक स्पेनिश पॉप गायक आहेत. सध्या ती अमेरिकेत राहते.
वाचा : … या देशात धावते जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन!
नथालियाने आठवड्याभरापूर्वी राहुल गांधी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. ‘राहुल गांधी हे उत्तम वक्ते आहेत. ते हुशार आहेत. त्यांना भेटण्याची संधी मला मिळाली यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते’ असं ट्विट करत तिने फोटो शेअर केले. नथालियाने इन्स्टाग्रामवरही त्यांचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर केल्यानंतर आठड्याभरातच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. पण ती हॉलिवूड अभिनेत्री असल्याचे समजताच सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
Last night with the eloquent and insightful Rahul Gandhi….. pic.twitter.com/3w27FBb0Pa
— Nathalia Ramos (@nathalia73) September 14, 2017
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 21, 2017 5:14 pm