02 March 2021

News Flash

रेल्वेच्या लोको पायलटनं वाचवले तीन हत्तींचे प्राण; पीयूष गोयल यांनी शेअर केला व्हिडीओ

मोठ्या प्रमाणात व्हिडीओ होतोय व्हायरल

तीन हत्तींसह एका पिल्लाचे प्राण वाचवण्यासाठी ट्रेन थांबवणाऱ्या लोको पायलटचं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी कौतुक केलं. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. पीयूष गोलय यांनी लोको पायलटच्या सतर्कतेचं उदाहरण दाखवताना एक छोटी क्लिप आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. यामध्ये एका पिल्लासह तीन हत्ती रेल्वे रूळ ओलांडताना दिसत आहेत.

ही घटना पश्चिम बंगालमधील सिवोक-गुलामा येथील आहे. हत्ती रेल्वे रूळ ओलांडत असताना लोको पायलटनं सतर्कता दाखवत ट्रेन थांबवली. दरम्यान, हत्ती रेल्वे रुळ ओलांडून गेल्यानंतर त्यांनी गाडी पुन्हा पुढच्या दिशेनं नेली. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात एक क्लिप शेअर करत लोको पायलटचं कौतुकही केलं. “लोको पायलटनं दाखवलेल्या सतर्कतेमुळे एक
पिल्लू आणि तीन मोठ्या हत्तींचे जीव वाचले. हे हत्ती रेल्वे रूळ ओलांडत होते. लोको पायलटनं त्वरित ट्रेन थांबवली आणि त्यानंतर हत्तींनी सुखरूप रेल्वे रूळ ओलांडला,” असं पीयूष गोलय यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 4:33 pm

Web Title: railway minister piyush goyal shares video how loco pilot saved 3 elephant and baby elephants life viral video jud 87
Next Stories
1 दिवाळी बोनस आणि ऑफिसवरील भन्नाट मीम्स
2 नुसतं ‘चिकन’ हा शब्द ऐकून ६२ दिवसांपासून कोमात असलेला तरुण शुद्धीवर आला
3 गोल्फमध्ये यापेक्षा भारी शॉट तुम्ही पाहिलाच नसेल ! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Just Now!
X