सीमारेषेवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना एक व्यक्ती गेल्या २० वर्षांपासून पत्र लिहत आहे. या पोस्टकार्डवर तिरंग्याचे चित्र रेखाटलेले असते. जितेंद्र सिंह गुर्जर असे त्यांचे नाव आहे. सुरतमधील एका खासगी कंपनीमध्ये ते सुरक्षारक्षक म्हणून कामावर आहे. तिरंग्याच्या बाजूला सत्यमेव जयते लिहायला गुर्जर विसरत नाही. १९९९ च्या कारगील युद्धामध्ये शहीद झालेल्या विरांची यशोगाथा गुर्जर यांना पत्र लिहण्यास प्रेरित करते.

“आज कारगिल युद्धाला होऊन २० वर्षांचा कालावधी उलटला आहे. या युद्धामध्ये माझ्या गावातील जवान शहीद झाले आहेत. त्यांच्या यशोगाथाच्या गोष्टी ऐकल्या आहेत. आणि त्या मला त्यांच्या कुटुंबीयांना पत्र लिहण्यास प्रेरित करतात, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.”

मुळचे राजस्थानमधील भरतपूरमध्ये राहणाऱ्या सिंह यांना शहिदांच्या कुटुंबीयांकडून पत्राचे उत्तरही मिळते. त्या उत्तराला पाहून त्यांच्या मनाला शांती मिळते. ‘ काही पत्रे शहिदांच्या कुटुंबीयांना त्यांच्या आठवणीत कधी रडवते तर कधी आनंद देते. काही शहिदांची कुटुंबीय त्याच्या आठवणीत हरवून जातात. सिंह यांनी ४० ते ५० शहीद झालेल्या विरांच्या कुटुंबीची भेटही घेतली आहे. काही कुटुंबीयांनी माझ्यासोबत मुलासारखा व्यवहार केला. ज्या कुटुंबीयांची मी भेट घेतली तेथील माती घेऊन आलो आहे. जेणेकरून त्या मातीपासून मी शहीद स्मारक बनवेल. असे सिंह म्हणाले.’