News Flash

हे काय? ‘काँग्रेस जैन’ पक्षाचं नाही तर मुलाचं नाव, कारण…

जेव्हा माझे मुल मोठे होईल तेव्हा तेही कॉंग्रेस पक्षात सक्रियपणे काम करेल

मुलाचं नाव काय ठेवावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न. सगळ्यानीच नावाच कौतूक करावं म्हणून आईवडील किती मेहनत घेतात. पण, राजस्थानमध्ये आईवडिलांनी चक्क मुलाचं नाव काँग्रेस ठेवलं आहे. उदयपुरमधील एका व्यक्तीने ठेवलेल्या नावावरून सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री कार्यालयात माध्यम अधिकारी म्हणून काम करणाऱ्या विनोद जैन यांनी मंगळवारी आपल्या मुलाचे नाव ‘कॉंग्रेस जैन’ असे ठेवले आहे.

विनोद जैन म्हणाले की, “आमचं संपूर्ण कुटुंब कॉंग्रेस पक्षाशी जोडलेले आहे. त्यांची पुढची पिढी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवू इच्छित आहे. म्हणून आपल्या मुलाचे नाव पक्षाच्या नावावरुन ठेवले आहे. माझ्या कुटुंबातील काही सदस्यांना मुलाला कॉंग्रेस म्हणूनच बोलवायचे होते. माझ्या मुलाचा जन्म जुलैमध्ये झाला होता. त्याच्या जन्माच्या प्रमाणपत्र नोंदणीस काही महिने लागले. आज राज्य सरकारने त्यांचे जन्म प्रमाणपत्र दिले. आता त्याला कॉंग्रेस म्हणून ओळखले जाईल. मी अशोक गहलोत यांच्या पासून प्रेरित झालो आहे आणि मी अशोक गहलो यांच्या बरोबर आहे. मला असे वाटते की जेव्हा माझे मूल १८ वर्षांचे होईल, तेव्हा तो देखील राजकीय कारकीर्द सुरू करतील. मी मुलाचे नाव मोठ्या अपेक्षांनी ठेवले आहे. माझी इच्छा आहे की जेव्हा माझे मुल मोठे होईल तेव्हा त्यानेही कॉंग्रेस पक्षात सक्रियपणे काम करेल, असंही जैन म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2020 2:00 pm

Web Title: rajasthan vinod jain names his baby congress abn 97
Next Stories
1 Art vs Artist ट्रेण्डवरुन भाजपाचा आपवर निशाणा; नेटकऱ्यांनी मोदींना केलं ट्रोल
2 रिअलमी म्हणजे ‘कॉपी कॅट’ ब्रँड, ‘मिस्टर बीन’च्या व्हिडिओद्वारे शाओमीने केले ट्रोल
3 Video : …म्हणून Amazon च्या सीईओंनी चालवली इ-रिक्षा
Just Now!
X