News Flash

…अन् घोडी नवरदेवाला घेऊन वरातीमधून पळून गेली; व्हिडीओ झाला व्हायरल

वरतीसोबत आलेले काही तरुण आपल्या मोबाइलमध्ये करत असतानाच हा गोंधळ उडाला आणि तो कॅमेरात कैद झाला

हा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरतोय

भारतामध्ये लग्नाच्या वरातीत नवरदेव हा पांढऱ्या घोड्यावर छान ऐटीत बसून येतो. उत्तरेकडील राज्यांमध्ये नवरदेव घोड्यावर बसूनच मुलीच्या घरी लग्नासाठी जातो. अनेक नवरदेव अगदी थाटात घोड्यावर बसून नवरीच्या घरी येतात. मात्र काही नवरदेवांना घोड्यावर बसताना भीती वाटत असल्याने गंमतीजंमती घडतात आणि त्याचे व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीची असून तो राजस्थानमध्ये शूट करण्यात आलाय. मात्र या व्हिडीओमध्ये झालेला गोंधळ असा आहे की नवरीला घेऊन जाण्यासाठी घोड्यावर आलेला नवरदेव तिला न घेताच घोड्यावरुन निघून गेला. बरं आल्या मार्गी परत फिरण्यासाठी कारण ठरला एक फटाका.

युट्यूबबरोबरच सोशल नेटवर्किंगवर लग्नामधील गोंधळांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र सध्या व्हायरल झालेला हा व्हिडीओ हसू की रडू असा प्रश्न निर्माण करणार आहे. ही घटना राजस्थानमधील अजमेर शहरामध्ये घडली. अजमेरमधील नसीराबादमधील रामपुरा गावातील एका नवरदेवाची घोड्यावरुन वरात काढण्यात आलेली. मात्र अचानक फटाक्याचा आवाज ऐकून घोडी घाबरली आणि नवरा खाली उतरण्याआधीच तिने धूम ठोकली. त्यामुळे नवरदेवही घोडीबरोबर निघून गेला आणि मुलीबरोबरच मुलाच्या घरच्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाची जागा चिंतेने घेतली.

नक्की पाहा >> Video : उंदीर दिसताच संसदेत नेत्यांची धावपळ; व्हिडीओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

या व्हिडीओमध्ये तोरण बांधण्याची प्रथा सुरु असल्याचं दिसतंय. मुलाकडचे, मुलीकडचे सर्वचजण फार आनंदात दिसत होते. मात्र एक फटाका फुटला आणि घोडी बिथरली. नवरा घोडीवर बसलेला असतानाच ती वेगाने रस्त्यावरुन धावत सुटली. नवरा मुलगा घोडीला थांबवण्याचा फार प्रयत्न करत होता. मात्र घोडीचा लगाम लागचा नाही आणि काही सेकंदांमध्ये घोडी कॅमेराच्या फ्रेममधून बाहेर निघून जात दूर पळून गेली. घोडीला थांबवण्याचा प्रयत्न तिच्या मलकाने केला मात्र त्यालाही घोडीची लगाम सापडली नाही आणि घोडी नवरदेवासहीत वेगाने निघून गेली. या साऱ्या प्रकारामुळे वरातीत आलेल्या बायका मात्र चांगल्याच गोंधळल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे. सुरु असणाऱ्या प्रथांचे शुटींग वरतीसोबत आलेले काही तरुण आपल्या मोबाइलमध्ये करत असतानाच हा गोंधळ उडाला आणि तो कॅमेरात कैद झाला. देनिक भास्करने या वरतीमध्ये डीजे सिस्टीम पुरवणाऱ्याशी या घटनेसंदर्भात चर्चा केली असताना घडलेल्या घटनाक्रमानंतर नवरदेवाला मळमळल्यासारखं होऊ लागलं. पण थोडावेळ विश्रांती घेतल्यावर पुढील प्रथा पूर्ण करुन लग्न लावण्यात आलं. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कोणतही मोठं वाहन नसल्याने मोठा अपघात झाला नाही.

वेगवेगळ्या चॅनेल्सवरुन आणि पेजेसवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्याला हजारोंच्या संख्येने व्ह्यूज आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 3:45 pm

Web Title: rajasthan wedding viral video horse run away with groom scsg 91
टॅग : Social Viral
Next Stories
1 Video : उंदीर दिसताच संसदेत नेत्यांची धावपळ; व्हिडीओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू
2 पहाटेचा शपथविधी, विरोधी घोषणा आणि अजित पवारांकडे पश्चात्तापदग्ध क्षमायाचना; चर्चेत आली ‘ती’ जाहिरात
3 “तारीख पे तारीख” ओरडत दिल्लीतील कोर्टात आदळआपट; दामिनीतल्या सनी देओलच्या डायलॉगची पुनरावृत्ती
Just Now!
X