आज देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्सावात साजरा होत आहे. तेव्हा पंतप्रधान कार्यालयाकडून एक अनोखा फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला, ज्यात १०३ वर्षांच्या वृद्ध महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली आहे.

शरबती देवी असं त्यांचं नाव असून त्यांना मोदींना भेटण्याची इच्छा होती. त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत मोदींना पत्रही लिहिले होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने मोदींनी शरबती देवींना घरी येण्याचं आमंत्रण दिलं. शरबती देवी या आपल्या कुटुंबासमवेत मोदींच्या निवासस्थानी पोहोचल्या, त्यांनी यावेळी मोदींना राखी देखील बांधली. ५० वर्षांपूर्वी शरबती देवींच्या भावाचं निधन झालं होतं. गेली पन्नास वर्षे आपल्या भावाच्या आठवणीत त्या जगत होत्या. रक्षाबंधनच्या सणाला त्यांना नेहमीच आपल्या भावाची आठवण यायची. पण आज तब्बल पन्नास वर्षांनंतर त्यांना मोदींच्या रुपानं आपला भाऊ परत मिळाला.

वाचा : मोदींची पाकिस्तानी बहिण, ३६ वर्षांपासून बांधते राखी

वाचा : ना दागिने, ना पैशांचा आहेर, भावाने बहिणाला भेट म्हणून दिले शौचालय

मोदींची भेट घेतल्यानंतरचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता, त्यांनी मोंदीशी बराचवेळ संवादही साधला. आज शाळकरी मुलींनी आणि वृंदावन इथल्या विधवा महिलांनी देखील मोदींची भेट घेऊन त्यांना राखी बांधली.