एअर एशियाचे विमान लँड होण्याआधीच एका माथेफिरु प्रवाशाने विमानाचे दार उघडल्याने एकच खळबळ उडाली. रांची विमानतळावर विमान उतरण्याआधीच या प्रवाशाने दार उघडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता, मात्र सुदैवाने तो टळला. या घटनेनंतरही सर्व प्रवासी सुरक्षितपणे पोहोचले आणि कोणालाही ईजा झाली नाही. घटनेनंतर या माथेफिरु प्रवाशाला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एअर इंडियाच्या ‘नॉन- व्हेज’ पॉलिसीवर विस्तारा एअरलाईन्सची मार्मिक जाहिरातबाजी

या प्रवाशाने अशाप्रकारे दरवाजा उघडण्याचे धाडस का केले? त्याने हे कृत्य केले तेव्हा विमानातील कर्मचारी कुठे होते? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. याआधीही अशा काही घटना विमानात घडल्या आहेत. नुकतेच आंतरराष्ट्रीय मार्गावर प्रवास करणारे एक विमान गळत असल्याची बातमी होती. तर विमान फुल झाल्याने प्रवाशांनी उभ्याने प्रवास केल्याच्याही घटना पाहायला मिळाल्या होत्या.

याशिवाय एअर इंडियाच्या विमानात चक्क एसी बंद असल्याने विमानातल्या प्रवाशांना बडोदा ते दिल्ली असा उकाड्यातच प्रवास करावा लागला होता. उकाड्याने हैराण झालेल्या प्रवाशांनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला. एअर इंडियाचे AI-880 हे विमान रविवारी संध्याकाळी बडोदा विमानतळावरून नवी दिल्लीला जाण्यास निघाले होते. या विमानात १६८ प्रवासी होते. पण प्रवासादरम्यान विमानातील एअर कंडिशन सिस्टिम बंद पडली, तेव्हा प्रवाशांची मोठी नाचक्की झाली.

Video : ‘ती’ ठरली बोईंग चालवणारी जगातील सर्वात तरूण पायलट