उत्तर प्रदेशातल्या चंदेली कुटुंबात जन्माला आलेल्या राणी दुर्गावती याचं लग्न १५४२ मध्ये गोंडवानाचे राजे संग्राम शहा यांचा मुलगा दलपत शहाशी झाले. १५५० मध्ये पतीच्या निधनानंतर राणी दुर्गावती गोंडवानाच्या गादीवर आल्या. मुघल सैन्याशी लढताना त्यांनी रणांगणावर २४ जून १५६४ रोजी शत्रूच्या हाताने मरण्याऐवजी युद्धभूमीवर चाकूने स्वत:वर वार करुन घेत आत्महत्या केली.

आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल १० इंटरेस्टिंग फॅक्टस

१. राणीचा जन्म दुर्गाष्टमीच्या शुभ हिंदू सणात झाला होता, म्हणूनच त्यांचे नाव दुर्गावती असे ठेवण्यात आले.

sandeshkhali shahajahan shiekh
Sandeshkhali Case: लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली?
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला

२. राणी दुर्गावतीने त्याच्या लग्नाआधी दलपत शहा यांच्या शौर्याविषयी ऐकले होते. राणीने त्यांना एक गुप्त पत्र लिहून मला तुमची जोडीदार होण्याची इच्छा आहे, असं म्हटलं होतं. या पत्रानंतर दलपत शाहा यांनी राणी दुर्गावतीशी त्यांच्या कुलदेवी मंदिरात लग्न केले.

३.  दिवाण ब्योहर अधार सिम्हा आणि मंत्री माण ठाकूर यांच्या सहकार्याने राणीने पतीच्या निधनानंतर गोंडवाना साम्राज्यावर यशस्वीरित्या १६ वर्षे राज्य केले.

४. राणी घोडेस्वारी, तीरंदाजी आणि इतर खेळांमध्ये चांगली प्रशिक्षित होत्या तसेच त्या त्यांच्या युद्धकौशल्यांसाठी प्रसिद्ध होत्या.

५. राणी दुर्गावती एक उत्कृष्ट शिकारी म्हणून ओळखल्या जात होत्या.

६. राणी दुर्गावती यांनी मुघल बादशहा अकबरच्या सैन्याशी लढा दिला आणि पहिल्या युद्धामध्ये त्यांना आपल्या राज्यातून हुसकावून लावले.

७. मुघल सैन्याशी झालेल्या शेवटच्या युद्धादरम्यान, राणीचा रात्री शत्रूंवर हल्ला करण्याचा इरादा होता. परंतु त्यांच्या अधिकाऱ्यांनी असा रात्री हल्ला करण्यास नकार दिला. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी मुघल मोठ्या शस्त्रांसह राणीच्या छावणीवर चाल करुन आली.

८. जेव्हा राणीच्या मंत्र्यांनी मुघल सैन्याच्या सामर्थ्याचा उल्लेख केला तेव्हा राणीने उत्तर दिले, “स्वाभिमानाने जगण्यापेक्षा सन्मानाने मरणे चांगले. मी माझ्या देशाची सेवा करण्यासाठी बराच काळ घालवलाय आणि या क्षणी, मी थांबणार नाही. संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही. ”

९. राणी दुर्गावतीच्या हुतात्म्याला भारत कधीच विसरणार नाही, म्हणूनच २४ जून हा त्यांचा ‘बलिदान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

१०. मध्य प्रदेश सरकारने जबलपूर विद्यापीठाला १९८३ मध्ये  ‘राणी दुर्गावती विश्वविद्यालय’ असे नाव दिले.  राणी दुर्गावतीच्यान नावाने संग्रहालये, टपाल तिकिटे असून त्यांचं नाव रेल्वेशी संबंधित काही सेवांनाही देण्यात आलंय.