18 January 2021

News Flash

धक्कादायक! महिलेवर सामूहिक बलात्कार कसा करावा? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

पोलिसाकंडून तपास सुरु

प्रतिकात्मक

उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशभरात संताप असतानाच सोशल मीडियावरील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हाथरसनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेची मागणी होत असताना सोशल मीडियावर महिलेवर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार कसा करावा हे सांगणारी एक पोस्ट व्हायरल झाली आहे. कोलकातामधील अनेक जणांनी बंगाली भाषेत असणारी ही पोस्ट शेअरदेखील केली आहे.

प्रणाधिका सिन्हा देवबर्मन यांनी ८ ऑक्टोबरला या पोस्टबद्दल कोलकाता पोलिसांकडे तक्रार दाखल करत ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी याप्रकरणी कायदेशीर सल्ला मागितला आहे. ही पोस्ट भारताबाहेरुन शेअर झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रणाधिका यांनी कोलकाता पोलीस आयुक्त तसंच सहआयुक्तांना ट्विट करत यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. “आधीच आपल्या आजुबाजूला लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना घडत असताना सोशल मीडियावर कोणीतरी बलात्कार कसा करावा हे समजवणारी व्यक्ती नको, कृपया मदत करा,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

प्रणाधिका यांच्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी सहआयुक्तांकडे (गुन्हे) सर्व माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सायबर लॉ तज्ञ बिवस चॅटर्जी यांनी, पोलीस गुन्हा दाखल करु शकतात तसंच पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीची माहितीही मिळवू शकतात असं म्हटलं आहे. ही पोस्ट बांगलादेशमधून शेअऱ झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 5:01 pm

Web Title: rape post explaining procedure in bengali goes viral sgy 87
Next Stories
1 तेरे जैसा यार कहा…. ११ फूटाचा अजगर ८ वर्षाच्या मुलीचा आहे ‘बेस्ट फ्रेंड’
2 लग्नासाठी अजबच अट; सोशल मीडिया वापरणारी बायको नकोच
3 Flipkart म्हणतं नागालँड भारताच्या बाहेर; म्हणून आम्ही…
Just Now!
X