कर्नाटकच्या जंगलांमधील ब्लॅक पँथरचे काही थक्क करणारे फोटो समोर आले आहेत. इंटरनेटवर हे फोटो व्हायरल झाले असून नेटकरी या फोटोंच्या प्रेमात पडले आहेत. वाइल्ड लाइफ फोटोग्राफर असणाऱ्या शहाझ जंग यांनी काढलेले हे फोटो काबीनी जंगलांमधील आहेत. अर्थ नावाच्या ट्विटवरील अकाउंटवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

“काबीनीच्या जंगलांमध्ये फिरणारा हा बॅक पँथर पाहा,” अशा कॅप्शनसहीत हा फोटो अर्थ या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये धुरकट पार्श्वभूमीवर घनदाट झाडांमध्ये असणाऱ्या गवतावरुन पँथर चालताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये हा पँथर झाडाच्या मागून डोकवून बघताना दिसत आहे. खूपच क्वचित दिसणारा हा प्राणी या फोटोमध्ये खरोखरच खूप सुंदर दिसत आहे.

जंगल बुकचे लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या कथेची अनेकांना हा फोटो पाहून आठवण झाली आहे आहे. जंगल बुकमधील कथेनुसार बगीरा मोगलीला जंगलामध्ये घेऊन येतो आणि त्याला जंगलातील राहणीमान शिकवतो. “केवळ भारतामध्येच बगीरा अशाप्रकारे प्रत्यक्षात दिसू शकतो अगदी जंगल बूकप्रमाणे. केवळ भन्नाट,” असं एकाने म्हटलं आहे.

पाच जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता शेअर केलेला फोटो ३६ तासांमध्ये प्रचंड व्हायरल झाला आहे. ५४ हजार जणांनी हा फोटो रिट्विट केला असून दोन लाख ३४ हजारहून अधिक जणांनी तो लाइक केला आहे. तर या फोटोवर कमेंट करणाऱ्यांची संख्या एक हजार ८०० हून अधिक आहे.

नक्की पाहा >> बापरे… ‘उडणारा’ साप!; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न, ‘२०२० आणखीन काय काय दाखवणार?’

काहींना या ब्लॅक पँथरला ब्लॅक ब्युटी म्हटलं आहे तर काहींना यामध्ये मोगलीमधील बगीरा दिसला आहे. नेटकऱ्यांनी काय कमेंट केल्या आहेत पाहुयात…

१) भन्नाट

२) हा तू आहेस का बगीरा

३) वा काय सौंदर्य आहे

४) अरे हा तर आपला बगीरा

५) निव्वळ प्रेम

६) वा काय फोटोय

७) मोगली कुठं आहे?

८) सुंदर

एवढ्या साऱ्या कमेंट वाचून तुम्हाला या फोटोबद्दल काय वाटतयं ते ही खाली कमेंट करुन नक्की कळवा.