14 August 2020

News Flash

११८ वर्षांनंतर भारतात सापडली ‘ही’ दुर्मिळ वनस्पती

दुधवा टायगर रिझर्व्हमध्ये हे फूल पाहायला मिळाले.

भारतामध्ये ११८ वर्षांनंतर ऑर्किड या दुर्मिळ फुलाची एक प्रजाती सापडली आहे. उत्तर प्रदेशातील दुधवा टायगर रिझर्व्हमध्ये हे फूल पाहायला मिळाले. या दुर्मिळ फुलाचे वैज्ञानिक नाव Eulophia Obtusa असे असून त्याची ओळख ग्राउंड ऑर्किड अशीही आहे. दुधवा टायगर रिझर्व्हमध्ये वन अधिकारी आण वन्यजीव तज्ज्ञाच्या निरीक्षणादरम्यान आर्किड प्रजातीचे Eulophia Obtusa हे फूल पाहायला मिळाले. या फुलाला अखेरचं १९०२ मध्ये पीलीभीतमध्ये पाहायला मिळाले होतं. इंग्लैंडमध्ये क्यू हर्बेरियमच्या दस्तावेजात याची नोंद आहे. १९ व्या शतकात गंगा नदीच्या मैदानी भागातून वैज्ञानिकांनी ही वनस्पती येथे आणली होती. पण, मागील १०० वर्षांपासून ही प्रजाती पाहायला मिळाली नाही.

दुर्मिळ प्रजातीचा शोध घेणारे संजय पाठक म्हणाले की, ‘३० जून रोजी आम्हाला ऑर्किडच्या या दुर्लभ प्रजातीचं फूल दिसले. या फूलांची छायाचित्रे आम्ही बांगलादेश बांगलादेशमधील वनस्पतिशास्त्रज्ञ मोहम्मद शरीफ हुसैन सौरव यांना पाठवले. त्यांनी हे फूल Eulophia Obtusa प्रजातीचे असल्याचे म्हटले आहे.’

वर्ल्ड वाइल्ड फंड फॉर नेचर (WWF) भारतचे समन्वयक डॉक्टर मुदित गुप्ता म्हणाले की, ‘लवकरच या फुलासंदर्भात एक व्यापक सर्व्हे हाती घेण्यात येऊ शकतो.’ दरम्यान, ऑर्किडच्या १,२५६ प्रजाती भारतामध्ये आढळतात. त्यापैकी ३८८ प्रजाती स्थानिक स्वरुपाच्या आहेत. देशात आढळणाऱ्या एकूण आर्किड प्रजातींपैकी तब्बल ३०० स्थानिक प्रजाती या पश्चिम घाटात आढळतात. यांपैकी तब्बल १०५ स्थानिक प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 8:50 am

Web Title: rare orchid species eulophia obtusa in dudhwa nck 90
Next Stories
1 Viral video : हत्तीची चाल पाहून कॅटवॉकही विसराल
2 फोटोसाठी काहीपण! पोटावर मधमाश्या ठेवत केलं मॅटर्निटी फोटोशूट
3 ‘मोगली किधर है बगीरा?’; दुर्मिळ ब्लॅक पँथरच्या दर्शनानंतर नेटकऱ्यांना आठवलं जंगल बूक
Just Now!
X