सध्या एक सुंदर मगर सगळ्यांना भुरळ पाडत आहे. आता तुम्ही म्हणाल मगर आणि भुरळ पाडणे याचा काहीच संबध नाही बुवा.. मग मगर भुरळ कशी पाडेल बरं? पण याचे कारणही तसेच आहे. ही इतर मगरींसारखी नक्कीच नाही तिच्यात दडलंय वेगळेपण. ते वेगळेपण म्हणजे असे की ही मगर चक्क पांढ-या रंगाची आहे.  मोत्यासारख्या रंगाने अन् गुलाबी डोळ्यांनी तिने सगळ्यांनाच ‘घायाळ’ केलय.

VIRAL VIDEO : गायीलाही पाणीपुरी खाण्याचा मोह आवरेना

फ्लोरिडाच्या गेटर पार्क मध्ये असणारी पांढरी मगर इतकी प्रसिद्ध आहे की सोशल मीडियावर तर तिचे फोटो व्हायरल होत आहेत, ती खासही आहे म्हणा. या मगरीच्या पांढ-या रंगाने तिला इतकी प्रसिद्धी लाभली आहे की तिची एक झलक पाहण्यासाठी पर्यटकांची येथे गर्दी असते. मोत्यासारखी चकाकणारी त्वचा आणि किंचितसे गुलाबी छटा असणारे डोळे असलेली मगर कोणी क्वचितच पाहिली असेल. या पार्कमध्ये ‘पर्ल’ या नावाने ती ओळखली जाते. या अल्बीनो मगरी इतक्या दुर्मिळ आहेत की एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार २००९ पर्यंत जगात पांढ-या रंगाच्या फक्त १२ मगरी होत्या.

वाचा : वर्षभर मेहनत करून गावकरी महिलांनी हत्तींसाठी विणले स्वेटर

पर्ल ही दहा वर्षांची आहे. तीन वर्षांची असताना तिला या पार्कमध्ये आणण्यात आले. साडेसात फूट लांब असलेल्या या पांढ-या मगरीची विशेष काळजी घेण्यात येते. जंगलात फार कमी काळ या मगरी जिवंत राहू शकतात, म्हणून त्यांची संग्रहालयात विशेष काळजी घेण्यात येते.

Viral Video : अबब! पर्यटकांसमोर आली अजस्त्र मगर