News Flash

रतन टाटा यांनी पोस्ट केला तरुणपणीचा फोटो, नेटकऱ्यांचा बसेना विश्वास

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी इन्स्टाग्रामवर नुकतंच पदार्पण केलं असून आपल्या पोस्टच्या माध्यमातून अनेकदा ते सोशल मीडियावर चर्चेत असतात

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी इन्स्टाग्रामवर नुकतंच पदार्पण केलं असून आपल्या पोस्टच्या माध्यमातून अनेकदा ते सोशल मीडियावर चर्चेत असतात. प्राण्यांच्या फोटोंपासून ते प्रेरणादायक किस्से अशा अनेक गोष्टी शेअर करत आपल्या फॉलोअर्सना प्रेरणा देण्याचं काम करत असतात. त्यांच्या फॉलोअर्सनाही रतन टाटा काय पोस्ट करणार याची उत्सुकता लागलेली असते. गुरुवारी रतन टाटा यांनी इन्स्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे.

रतन टाटा यांचा हा फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडत असून अनेकांना तर हा त्यांचा फोटो आहे यावर विश्वासच बसत नाही आहे.

फोटो शेअर करताना रतन टाटा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “मी हा फोटो बुधवारी शेअर करणार होतो. पण नंतर मला कळलं की थ्रोबॅक (Throwback) फोटो गुरुवारी शेअर केला जातो. यासाठीच माझ्याकडून लॉस एंजेलिसमधील हा थ्रोबॅक फोटो”. या फोटोला त्यांना ThrowbackThursday असा हॅशटॅग दिला आहे.

रतन टाटा यांचा हा तरुणपणातील फोटो आहे. रतन टाटा यांच्या या फोटोला काही तासातच लाखो लाइक्स मिळाले असून कमेंट्सचा तर पाऊस पडत आहे. रतन टाटा यांचे इन्ट्राग्रामवर आठ लाख ३१ हजार फॉलोअर्स आहेत. गुजरातमधील सूरत येथे २८ डिसेंबर १९३७ रोजी जन्म झालेले रतन टाटा आज ८२ वर्षांचे आहेत. रतन टाटा यांनी ऑक्टोबर महिन्यात इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 9:34 am

Web Title: ratan tata shares classic old photo on instagram throwback thursday sgy 87
Next Stories
1 मनसेने झेंड्यावर वापरलेल्या शिवमुद्रेचा अर्थ काय ?
2 हे काय? ‘काँग्रेस जैन’ पक्षाचं नाही तर मुलाचं नाव, कारण…
3 Art vs Artist ट्रेण्डवरुन भाजपाचा आपवर निशाणा; नेटकऱ्यांनी मोदींना केलं ट्रोल
Just Now!
X