क्षण कोणतेही असो पण ते कॅमेरात कैद करण्याचा एक नवा ट्रेंड सध्या रुजू झालाय. त्यातून बेबी शूट, कपल्स शूट, प्री वेडिंग शूट, मेटरनिटी शूट असे शेकडो प्रकार रूजू होत आहे. एरव्ही आपल्याला सोशल मीडियावर तरूण जोडप्यांचे अनेक फोटो दिसतात, पण गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावर एका वृद्ध जोडप्याचा फोटो व्हायरल होत आहे. साठी ओलांडलेलं हे जोडपं समुद्र किनाऱ्यावर एकमेकांसोबत आनंदात वेळ घालवत होते. आयुष्य आता संपायला आलंय तरी यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम काही कमी झालं नाही. प्रेमाला वय नसतं हे या फोटोतून दिसून येत होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर या जोडप्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असेलच.
हे फोटोशूट इरिना नावाच्या एका रशियन फोटोग्राफरने केलंय. हे फोटो तुफान व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिच्यापाशी या जोडप्याबद्दल चौकशी केली. अनेकांनी तिला मेसेजही केले, तेव्हा कुठे इरिनाने या फोटोशूटमागंचं सत्य सांगून टाकलं. या फोटोमध्ये जे वृद्ध जोडपं दिसतंय ते रिअल लाईफमध्ये मॉडलिंगचं काम करतात. त्यांचा यापूर्वी एकमेकांशी काहीच संबंध आला नाही. केवळ फोटोशूटसाठी त्यांना इरिनाने बोलवलं होतं. यापूर्वी एकमेकांसोबत कधीही काम न केलेल्या या दोन्हीं मॉडेल्सने फोटोशूटमध्ये एवढे अचूक हावभाव दिले की हे जोडपं नसून प्रोफेशनल मॉडेल आहेत हे सांगूनही कोणाला खरं वाटणार नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 29, 2017 9:30 am