08 March 2021

News Flash

रिलायन्स जिओची DTH सेवा, महिन्याला फक्त…

इतर कंपन्यांचे धाबे दणाणले

रिलायन्स जिओ IPTV सेट टॉप बॉक्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (छाया सौजन्य : बीजीआर)

रिलायन्सच्या जिओने टेलीकॉम क्षेत्रात आल्या आल्याच चांगली पकड बसवली त्यामुळे मोठमोठ्या टेलीकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत, आता रिलायन्स डिटीएच क्षेत्रातही उतरू पाहत आहेत. साधरण महिन्याभरात रिलायन्स आपल्या जिओ डिटीएच सेवेचे लाँचिग करणार असल्याची चर्चा आहे. रिलायन्स जिओ आता डिटीएच क्षेत्रात उतरणार म्हटल्यावर डिटीएच कंपन्यांनाही चांगलाच घाम फुटला आहे. अर्थात इतर कंपन्यांच्या डीटीएच सेवांवर याचा मोठा परिणाम होण्याची भिती कंपन्यांना आहे यातच ही डिटीएच सेवांचे टॅरिफ रेट हे १८० रुपये प्रतिमाह असल्याचे बोलले जात आहे. झी न्यूजच्या माहितीनुसार रिलायन्स डीटीएच सेवांचे पॅकेजिंग प्लान हे १८० रुपयांपासून सुरू होणार आहेत.

वाचा : काय आहे रिलायन्स जिओची ‘समर सप्राईज ऑफर’ ?

तर दुसरीकडे रिलायन्सची ही डीटीएच सेवा सुरूवातीला जिओ सारखीच मोफत असेल अशाही चर्चा आहेत. वेलकम ऑफर प्रमोशन अंतर्गत रिलायन्स जिओ तीन महिने ही सेवा ग्राहकांना मोफत देऊ शकतो याची शक्यताही नाकारता येत नाही. ही ऑफर येण्याआधीच रिलायन्स जीओच्या सेटटॉप बॉक्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वेगवेगळ्या अँगलने काढलेले हे फोटो ‘कँडीटेक’ या बेवसाईटवर शेअर करण्यात आले. रिलायन्स जिओ लाईव्ह स्टिमिंगची सुविधा तसेच ३५० चॅनेल देणार असल्याचे समजते आहे. यातले ४८ चॅनेल हे एचडी असणार आहे. तसेच ‘catch up’ हे नवे फिचर देखील असणार आहे. या फिचरच्या साह्याने ग्राहक सात दिवसांपूर्वीचे कार्यक्रमही पाहू शकणार आहे. दुसरं म्हणजे फक्त आवाज कमी जास्त करण्यासाठी आणि चॅनेल बदलण्यासाठी वापरण्यात येणा-या रिमोटचे स्वरूपच रिलायन्सने बदलले आहे. हा रिमोट स्मार्ट असून वॉईस सर्च कमांडच्या साह्याने चॅनल बदलता येणार असल्याचेही वृत्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 2:02 pm

Web Title: reliance jio dth service plan may be cheaper than other service
Next Stories
1 गर्लफ्रेण्ड न मिळाल्याने त्याने केलं रोबोटशी लग्न!
2 काय आहे रिलायन्स जिओची ‘समर सरप्राईज ऑफर’?
3 Viral : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी त्याने स्वत:च्या गाडीत गोळा केला कचरा
Just Now!
X