हो तुम्ही वाचलेलं शिर्षक बरोबर आहे. आता हे काय नवीन बॉयफ्रेंड ही काय भाड्याने घ्यायची गोष्ट आहे का असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल. पण सध्या विविध वयोगटातील लोकांमध्ये असणारे नैराश्य लक्षात घेता त्यांना एका चांगल्या मित्राची गरज असते. हेच लक्षात घेऊन कौशल प्रकाश या २९ वर्षाच्या तरुणाने हा अनोखा व्यवसाय सुरु केला आहे. नैराश्यात असणाऱ्या व्यक्तीला आपले म्हणणे कोणीतरी ऐकून घ्यावे आणि आपल्याला समजून घ्यावे इतकीच अपेक्षा असते. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून हेच काम साध्य होणार आहे. नैराश्यातील व्यक्तीचे समुपदेशन करणे ही जगावेगळी गोष्ट नसते. हे काम संवाद कौशल्ये असणारा व्यक्तीही चांगल्या पद्धतीने करु शकतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन करणे हा महत्त्वाचा उपाय ठरु शकतो.

आपल्या या नव्या व्यवसायाबाबत कौशल म्हणतो, मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारे लोक वेगळे काही करत नसून केवळ आपले म्हणणे ऐकून घेतात. आपण स्वत:ही ३ वर्षे नैराश्यात होतो, त्यामुळे आपल्याला ही संकल्पना सुचली असे तो सांगतो. कौशल पेशाने इंटेरियर डेकोरेटर असून त्याने आपली ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. यामध्ये ग्राहकांना ६ हॅंडसम मुलांचा पर्याय देण्यात आला असून त्यातील एका मुलाची निवड करता येईल. आपले मन मोकळे करण्यासाठी या मुलांसोबत वेळ घालवणे हा चांगला पर्याय ठरु शकतो असे त्याचे म्हणणे आहे. या मित्रासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता, जेवायला जाऊ शकता. ही मुले २२ ते २५ या वयोगटातील आहेत. यामध्येही सेलिब्रिटी हवा असल्यास तासाला ३ हजार रुपये, मॉडेलसाठी २ हजार रुपये आणि सामान्य व्यक्ती हवा असल्यास तासाला ३०० ते ४०० रुपये असा दर आकारण्यात येणार आहे.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
students election duty marathi news
निवडणुकीच्या कामासाठी आता विद्यार्थ्यांचीही नियुक्ती
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

सध्या ही सुविधा केवळ मुंबई आणि पुण्यात सुरु करण्यात आली असून येत्या काळात तिचा इतर शहरांत विस्तार करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. याबरोबरच टोलफ्री क्रमांकाची सुविधाही देण्यात आली असून तुम्हाला फोनवर संवाद साधायचा असल्यास १५ ते २० मिनीटासाठी ५०० रुपये भरावे लागतील. हा उपाय मानसिक संतुलन मिळविण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल असे कौशल याचे म्हणणे आहे.